Saturday, August 22, 2026

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : सुप्रीम कॉलनीतील गोमांस प्रकरणानंतर महापालिकेची धडक कारवाई, अनधिकृत गोडाऊन जमीनदोस्त

Jalgaon : जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गोमांस आढळल्याच्या घटनेनंतर जळगाव शहर महानगरपालिकेने (Jalgaon City Municipal Corporation) कठोर पवित्रा घेत धडक कारवाई केली. महापौर दीपमाला काळे (Mayor Deepmala Kale) यांच्या निर्देशानुसार महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी संबंधित अनधिकृत गोडाऊनवर कारवाई करत ते पूर्णपणे जमीनदोस्त केले.

महापौर दीपमाला काळे (Mayor Deepmala Kale) यांनी यापूर्वीच शहरात उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांसह अवैध गोमांस विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार सुप्रीम कॉलनी परिसरात संशयास्पद गोमांस आढळल्यानंतर महापालिका प्रशासन आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाने तातडीने कारवाई सुरू केली.

शुक्रवारी सकाळपासून राबविण्यात आलेल्या मोहिमेत गोमांस साठवणूक व विक्रीसाठी वापरले जात असल्याचे सांगितले जाणारे संबंधित गोडाऊन पाडण्यात आले. महापालिकेच्या या कारवाईमुळे बेकायदेशीर मांस विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, शहरातील अवैध मांस विक्री तसेच नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या व्यवसायांवर यापुढेही सातत्याने कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >