Sunday, July 12, 2026

Navneet Rana : 'शेरनी अगर शांत है तो डकारणा कधी भूलती नहीं,'; नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लाबोल

Navneet Rana : 'शेरनी अगर शांत है तो डकारणा कधी भूलती नहीं,'; नवनीत राणांचा विरोधकांवर हल्लाबोल

अमरावती : अमरावतीतील (Amravati) एका कार्यक्रमात बोलताना माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. माजी खासदार झाल्याची वेदना आजही मनात असल्याचे सांगतानाच, "शेरनी अगर शांत है तो डकारणा कधी भूलती नहीं, ," अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना इशारा दिला.

काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडे (MLA Balwant Wankhade) यांच्या टीकेला उत्तर देताना नवनीत राणा म्हणाल्या की, विरोधकांना शुभेच्छा दिल्या म्हणजे आपण शांत बसलो आहोत, असा अर्थ होत नाही. महिलांबाबत बोलताना विरोधकांनी मर्यादा पाळल्या पाहिजेत आणि आपण स्वतःही त्या मर्यादांचे नेहमी पालन केले असल्याचे त्यांनी सांगितले. (Maharashtra Politics)

आपल्या स्वाभिमानाशी तडजोड नाही...

राज्यसभेच्या उमेदवारीबाबत बोलताना त्यांनी, "स्वाभिमानासाठी राज्यसभेची संधीही नाकारली. दुसऱ्यांच्या दारात जाऊन पद मागण्यापेक्षा विचारांशी प्रामाणिक राहणं मला महत्त्वाचं वाटतं," असे सांगितले. नगरसेवकपदासाठीही अनेकजण प्रयत्न करतात, मात्र आपण स्वाभिमानाशी तडजोड केली नसल्याचा दावा त्यांनी केला.

यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त करत, रवी राणा (Ravi Rana) यांच्या माध्यमातून मतदारसंघातील विकासकामांना गती मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला.

नवनीत राणा यांच्या उध्दव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका 

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नवनीत राणा म्हणाल्या की, मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसाला विरोध करणाऱ्यांना सत्ता गेल्यानंतर राम आणि हनुमानाची आठवण झाली. "मला १४ दिवस तुरुंगात राहावं लागलं, तो काळ मी कधीच विसरणार नाही. मुख्यमंत्री असतानाच हनुमान चालीसा वाचली असती, तर पक्षात फूट पडली नसती," असा दावा त्यांनी केला.

नवनीत राणा यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >