गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे. आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणात तीन मुलींचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची राज्याच्या आदिवासी विकास विभागाने गंभीर दखल घेतली आणि दोघांना सेवेतून निलंबित केले. जपतलाई येथील खासगी अनुदानित आश्रम शाळेची संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी ज्यांच्यावर होती, ते सहाय्यक प्रकल्प अधिकारी पी. पी. सादमवार आणि तत्कालीन प्रभारी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस. एन. कन्नाके या दोघांवरही निलंबनाची कारवाई झाली आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील एका आश्रम शाळेच्या वसतिगृहात अनुसूचित जमातीच्या सहा विद्यार्थिनींना सर्पदंश झाल्याच्या एका ...
संपूर्ण आश्रम शाळेची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी असलेल्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण) पी. पी. सादमवार यांनी १० फेब्रुवारी आणि १ एप्रिल २०२६ रोजी शाळेला भेटी दिल्या होत्या. या कृतीतून त्यांनी सोपस्कार पूर्ण केला. पण शाळेतील व्यवस्थेत आढळलेल्या त्रुटींकडे दुर्लक्ष केले. शौचालय आणि बाथरूम अस्वच्छ होते. मुलींच्या वसतिगृहाजवळ कचरा आणि लाकडाचे तुकडे पडलेले होते. यामुळे सापाचा धोका वाढला. गंभीर बाब म्हणजे शाळेत प्रथमोपचार पेटी नव्हती. या गंभीर त्रुटींकडे सादमवार यांनी दुर्लक्ष केले. यामुळे सर्पदंशामुळे तीन मुलींचा हकनाक बळी गेला. याच कारणामुळे महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार अपर आयुक्त आयुशी सिंह यांनी सादमवार यांना निलंबित केलं आहे. सादमवार यांच्यासोबत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारे कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी कन्नाके यांनाही सेवेतून निलंबित करण्यात आले आहे . निलंबन काळात त्यांचे मुख्यालय भामरागड येथे असेल.






