- धरणातील पाण्याची पातळी घटल्याने आता गळती दुरुस्तीवर दिला जाणार भर
- मोडक सागरमधून दिवसाला ४० ते ४५ टक्के होतो पाणी पुरवठा
मुंबई (सचिन धानजी) :
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमधील पाण्याची पातळी खालावलेली असून पावसामुळे मुंबईकरांवर एकप्रकारे पाण्याचे संकट उभे राहिले आहे. मात्र, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोडक सागर धरणाला (Modak Sagar Dams) गळती लागल्याचे दिसून येत आहे. स्वयंचलित पूर नियंत्रण दरवाज्यांचे दोन्ही रबर सील म्हणजेच तळ आणि बाजूच्या सील कडक होऊन खराब झाले आहेत, ज्यामुळे या दरवाज्यांमधून पाण्याची गळती होत असून धरणातून मोठया प्रमाणात पाणी वाया जात आहे.
मुंबईला दररोज साधारणतः ४००० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो. तानसा धरण, मोडकसागर धरण, मध्य वैतरणा धरण, उर्ध्व वैतरणा आणि भातसा धरण यातून हा पाणी पुरवठा केला जात असून त्यापैंकी मोडक सागर धरण हे अतिशय महत्वाचे धरण आहे. यातून मुंबईला प्रतिदिन १७०० दशलक्ष लिटर एवढा पाणी पुरवठा होतो. उर्ध्व वैतरणा आणि मध्य वैतरणा धरणातील पाणी साठा हा मोडक सागर धरणात सोडला जातो आणि वैतरणा पात्रातील संपूर्ण पाणी हे मोडक सागर धरणाद्वारे मुंबई शहराला पुरविले जाते. (Modak Sagar Dams)
- आणखी पाच टक्के कपात पुढील आठवडयापासून ? मुंबई (सचिन धानजी) मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये अद्यापही पाण्याचा शिडकावा पडला ...
मोडक सागर धरणावर ०८ पूर नियंत्रण दरवाजे उपलब्ध आहेत. या ०८ पूर नियंत्रण दरवाजांना विशेष प्रकारचे रबर सील दिलेले आहेत. ज्यामध्ये खालचा आणि बाजूचा सील आहे. दरवाज्यांच्या खालून कोणतीही गळती होऊ नये. यासाठी खालचा सील दरवाजा स्पिलवेवर अशा पद्धतीने ठेवला जातो. तसेच बाजूचे सील एम.एस. विभागांसह अशाप्रकारे क्लॅम्प केलेले आहेत जेणेकरून दरवाजे स्थिर राहतील आणि बाजूने कोणतीही गळती होऊ नये. (Modak Sagar Dams)
हा स्टॉप लॉग दरवाजा किंवा स्टॉप ब्लॉक कोणत्याही दरवाज्याच्या अपयशामुळे मोठ्या गळतीच्या वेळी किंवा कोणत्याही दरवाज्याच्या देखभालीच्या कामाच्या दरम्यान एक आपत्कालीन दरवाज्याप्रमाणे वापरला जाऊ शकतो. या स्टॉप लॉग दरवाज्याला किंवा स्टॉप ब्लॉकला देखील गळती टाळण्यासाठी खालचा आणि बाजूचा रबर सील दिलेले आहेत असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Modak Sagar Dams)
तरीही आयुर्मान आणि हवामानामुळे झालेल्या परिणामांमुळे, स्वयंचलित पूर नियंत्रण दरवाज्यांचे दोन्ही रबर सील म्हणजेच तळ आणि बाजूच्या सील कडक होऊन खराब झाले आहेत, ज्यामुळे या दरवाज्यांमधून पाण्याची गळती होत असून धरणातून मोठया प्रमाणात पाणी वाया जात आहे. या ४ स्वयंचलित पूर नियंत्रण दरवाज्यांचे रबर सील तातडीने बदलण्याची गरज आहे. जेणेकरून धरणातून वाया जाणारे पाणी थांबवून पाण्याचा अपव्यय टाळता येईल. तसेच, स्टॉप लॉग दरवाजा किंवा स्टॉप ब्लॉकच्या रबर सीलचीही झीज होऊन ते खराब झाले आहे. त्यामुळे त्यांचेही रबर बदलून आकस्मिक परिस्थितीत काम करण्यासाठी तयार ठेवणे गरजेचे असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Modak Sagar Dams)
मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईला रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळून मुंबईतील मुलुंड,भांडुप, घाटकोपर,मालाड तसेच अंधेरी आदी भागांमध्ये पाणी ...
मागील पावसाळ्यात जेव्हा धरण पूर्ण क्षमतेने भरुन वाहत होते,त्यावेळी विद्युत चलित पूर नियंत्रण दरवाजांमधून पाणी गळती होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाया जाणारे पाणी या दरवाजांमधील रबर सील बदली करून टाळता येईल. यापूर्वी पूर नियंत्रण दरवाजा आणि स्टॉप लॉग दरवाजा किंवा स्टॉप ब्लॉकचे रबर सील बदलण्याचे काम सन २०१८ मध्ये करण्यात आले होते. तसेच धरण सुरक्षितता संघटना यांनी केलेल्या धरणाच्या पर्जन्यपूर्व तपासणी व पर्जन्योन्तर तपासणीमध्ये खराब झालेले रबर सील बदलण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे पूर नियंत्रण दरवाजा आणि स्टॉप लॉग दरवाजा किंवा स्टॉप ब्लॉक यांचे रवर सील बदलणे आवश्यक असून त्यानुसार आता हे रबर बदलण्याचे काम हाती घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यासाठी आता सुमारे ९८ लाख रुपये खर्च केले जाणार असून यासाठी हायड्रो इंजिनिअरिंग यांची निवड करण्यात आली आहे. (Modak Sagar Dams)
मोडक सागर धारणाची वैशिष्ट्ये :
मोडक सागर धरण हे प्री-कूल्ड काँक्रीट धरण आहे आणि १९५४ मध्ये कार्यान्वित केले आहे. या धरणाची लांबी ५७० मीटर आणि उंची ८२ मीटर आहे. मोडक सागर धरणाची एकूण साठवण क्षमता २०४.९८१ दशलक्ष घनमीटर आहे. मोडक सागर धरणावर ०८ पूर नियंत्रण दरवाजे उपलब्ध आहेत (त्यापैकी ०४ स्वयंचलित दरवाजे आणि ०४ विद्युत चलित दरवाजे) जे जास्त पावसाच्या काळात धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाणी सोडण्यासाठी एसओपीनुसार वापरले जातात. (Modak Sagar Dams)




