- महालक्ष्मी आणि देवनार येथे पर्यायी सुविधा
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
लहान पाळीव व भटके प्राणी जसे की मांजर, श्वान आदींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यासाठी सन्मानपूर्वक अंत्यविधीची सुविधा मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. पशुवैद्यकीय आरोग्य खाते आणि पी उत्तर विभाग कार्यालय यांच्यामार्फत ही सुविधा मालाड (पश्चिम) मध्ये एव्हरशाईन नगर येथे कार्यरत आहे. प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठीची दहन सुविधा वार्षिक नियोजित देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी २ जुलै ते ११ जुलै २०२६ या कालावधीत तात्पुरती बंद राहणार आहे. (Animal cremation facility at Malad)
- जिल्हा निवडणूक अधिकारी, महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे नागरिकांना आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, ...
दुरूस्ती आणि देखभालीच्या कालावधीत स्मशानभूमीतील यंत्रसामग्रीची स्वच्छता, तपासणी, इत्यादी तांत्रिक कामे केली जाणार आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. मृत पाळीव प्राणी आणि इतर प्राण्यांसाठी अंत्यसंस्कार सेवा विनाअडथळा सुरू राहावी, यासाठी महालक्ष्मी आणि देवनार या दोन्ही ठिकाणच्या सुविधा या कालावधीत उपलब्ध राहतील. देखभालीचे काम यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर, दिनांक १२ जुलै २०२६ पासून मालाड प्राणी दहन सुविधा पूर्ववत सुरू होण्याची अपेक्षा आहे. (Animal cremation facility at Malad)
- सन २०२६-२७ च्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला मंत्री नितेश राणे यांचे उत्तर मुंबई : राज्यातील मच्छीमारांसमोरील डिझेल दरवाढीचा प्रश्न सोडविण्यासाठी ...
मुंबई महानगरपालिका सर्व पशुपालक आणि नागरिकांना या काळात सहकार्य करावे. तसेच सार्वजनिक सुविधेच्या दृष्टीने या बदलाची नोंद घेऊन सर्वांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे. सदर बदलांमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महानगरपालिकेच्या आवश्यक त्या पर्यायी व्यवस्था वापराव्यात, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. (Animal cremation facility at Malad)





