पालकमंत्री नितेश राणे यांची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; स्वतंत्र मार्गिका, व्यावसायिक वाहनांना ५० टक्के टोल
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या भावना आणि मागणीची दखल घेत ओसरगाव टोलनाक्यावर ‘एमएच-०७’ पासिंग वाहनांना संपूर्ण टोलमाफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे मत्स्यविकास व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे (Guardian Minister Nitesh Rane) यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत सिंधुदुर्गवासीयांना ही मोठी भेट दिली आहे. या टोलनाक्यावर स्थानिक वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका (Lane) तयार करण्यात येणार असून, पिवळी पाटी असलेल्या व्यावसायिक वाहनांना टोल दरात ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.
लखनऊ(Lucknow) : अलीगंज (सेक्टर-डी) येथे एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरले आहे. या दुर्दैवी घटनेत १५ निष्पाप ...
आपल्या वाढदिवसानिमित्त जनतेशी संवाद साधताना पालकमंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाची घोषणा केली. ते म्हणाले, "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने राणे कुटुंबीयांवर आणि भारतीय जनता पक्षावर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे व आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जनतेचे ऋण फेडण्याची आणि त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची भावना मनात होती. जनतेची सेवा करणे आणि त्यांच्या प्रत्येक अडचणीत धावून जाणे हेच माझे कर्तव्य आहे," अशा भावना त्यांनी या वेळी व्यक्त केल्या.
नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा(rohit sharma) यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ...
ओसरगाव टोलच्या मुद्द्यावरून जिल्ह्यातील नागरिक आणि वाहनधारकांकडून सातत्याने टोलमाफीची मागणी होत होती. यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन नितेश राणे यांनी दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करत त्यांनी ‘एमएच-०७’ क्रमांकाच्या वाहनांसाठी टोलनाक्यावर स्वतंत्र लेन उपलब्ध करून दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील वाहनधारकांना आता कोणत्याही विनाव्यत्यय आणि अडचणीशिवाय प्रवास करता येणार आहे.
शेती महामंडळाची साडेचार हजार एकर जमीन देण्यास महसूल विभागाची मान्यता मुंबई : अहिल्यानगर जिल्ह्यातील हरेगाव मळा येथील ४ हजार २०० एकर जागा दारुगोळा ...
व्यावसायिक वाहनांना मोठा दिलासा
स्थानिक खाजगी वाहनांना पूर्ण टोलमाफी देतानाच, जिल्ह्यातील वाहतूकदार आणि व्यावसायिकांचाही विचार या निर्णयात करण्यात आला आहे. पिवळ्या क्रमांकाची पाटी असलेल्या 'एमएच - ०७' व्यावसायिक वाहनांसाठी संबंधित कंपनीने टोल दरात ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. हा निर्णय जिल्ह्यातील व्यावसायिक आणि वाहतूक क्षेत्राला मोठा दिलासा देणारा ठरेल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला."माझ्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्याच्या जनतेच्या मनातील एक महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविण्यात यश आले, हीच माझ्यासाठी वाढदिवसाची सर्वात मोठी भेट आहे," असे पालकमंत्री म्हणाले. तसेच या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis), खासदार नारायण राणे (MP Narayan Rane), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde), सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष आभार मानले आहेत.






