Tuesday, June 23, 2026

Fire Accident :लखनऊ कोचिंग क्लास आगप्रकरणी चौघांना अटक, चार अधिकारी निलंबित

Fire Accident :लखनऊ कोचिंग क्लास आगप्रकरणी चौघांना अटक, चार अधिकारी  निलंबित

लखनऊ(Lucknow) : अलीगंज (सेक्टर-डी) येथे एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरले आहे. या दुर्दैवी घटनेत १५ निष्पाप विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला असून, ९ जण गंभीर जखमी आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (adityanath) यांनी तातडीने कारवाई करत चार आरोपींना अटक केली असून, निष्काळजीपणा करणाऱ्या चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.

घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी त्यांचे नियोजित दौरे रद्द करून तातडीने लखनऊ गाठले. त्यांनी सर्वप्रथम घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि त्यानंतर केजीएमयू ट्रॉमा सेंटरमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये, तर जखमींना ५०-५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तपासात आढळलेल्या निष्काळजीपणामुळे गौरव कुमार , कमलेंद्र कुमार सिंह, अनिल कुमार आणि प्रमोद पांडे(pramod pande) या चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

विशेष तपास पथकाची स्थापना प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एसीएस अमृत अभिजात आणि एडीजी प्रवीण कुमार यांच्या नेतृत्वाखाली दोन सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाला येत्या सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिसांनी रामकृष्ण उपाध्याय, वीरेंद्र प्रसाद शुक्ला, तुषार कृष्णा जायसवाल आणि सुरेश कुमार साहू या चार आरोपींना अटक केली आहे.

इमारतीतील गंभीर अनियमितता तपासात असे समोर आले आहे की, संबंधित इमारत केवळ 'निवासी' वापरासाठी मंजूर होती, तरीही तिथे अनधिकृतपणे कोचिंग सेंटर चालवले जात होते. २०१६ मध्येच लखनऊ विकास प्राधिकरणाने या इमारतीवर कारवाईचे आदेश दिले होते, मात्र ते आदेश नंतर रद्द करण्यात आले होते. इमारतीचे फायर एनओसी, एलडीए आणि वीज विभागाची भूमिका या सर्व बाबींची एसआयटी आता सखोल चौकशी करणार आहे. या तपासणीत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग स्पष्ट होण्याची शक्यता आहे. अलीगंज पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा