Eknath Shinde : एकनाथ शिंदेंची शिवसेना मुंबईत उभारणार भव्य 'सेनाभवन'

दोन जागांबाबत चाचपणी; संघटनात्मक वाढीसाठी मध्यवर्ती मुख्यालयाची गरज


मुंबई : ऑपरेशन टायगर यशस्वी करून उबाठा गटात दोनवेळा फूट पाडणाऱ्या शिवसेनेचा विस्तार दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे राजधानी मुंबईत नेते, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी हक्काचे आणि सुसज्ज मध्यवर्ती कार्यालय असावे, असा उपमुख्यमंत्री तथा मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा मानस आहे. त्यानुषंगाने वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) आणि दादरमध्ये जागांची चाचपणी करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दादरमध्ये उभारलेल्या सेनाभवनाच्या धर्तीवर ही वास्तू असेल, अशी माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.



नव्या ‘सेनाभवना'साठी मुंबईत दोन जागांची प्राथमिक पाहणी झाली आहे. यातील पहिली जागा वांद्रे-कुर्ला संकुलात असून ती उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री' निवासस्थानापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे सुरुवातीला या जागेची मोठी चर्चा होती. मात्र, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे आणि खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांचे मत वेगळे असल्याचे समजते. "शिवसेना (shivsena) हा मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि अस्मितेसाठी स्थापन झालेला पक्ष आहे. कॉर्पोरेट कार्यालयांनी व्यापलेल्या बीकेसीमधून पक्षाचे मुख्य कार्यालय चालवणे योग्य ठरणार नाही. त्याऐवजी शिवसेनेच्या परंपरेशी, इतिहासाशी आणि चळवळीशी जोडलेल्या मराठमोळ्या दादर परिसरातच हे भव्य मुख्यालय असायला हवे," अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच दादरमधील जागेला पक्ष नेतृत्वाकडून अधिक प्राधान्य आणि पसंती मिळत आहे.



जून २०२२ मधील उठावानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांत, तालुक्यांत आणि गावागावांत शिवसेनेचे जाळे वेगाने विस्तारत आहे. नवनवीन कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इतर पक्षांतील नेत्यांचे 'इनकमिंग (incoming)' सातत्याने सुरू आहे. त्यात भर म्हणजे ऑपरेशन टायगर अंतर्गत ६ खासदार शिवसेनेत दाखल झाल्याने पक्षाचे बळ वाढले आहे. अशा स्थितीत पक्षाची ध्येयधोरणे ठरवण्यासाठी, संघटनात्मक बैठकांसाठी आणि एकूणच प्रशासकीय कामकाजासाठी एका हक्काच्या आणि भव्य मुख्यालयाची कमतरता पक्षाला जाणवत होती. मुंबई(mumbai) ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने आणि मुंबईवर राजकीय पकड मजबूत ठेवण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात सुसज्ज कार्यालय असणे अत्यंत गरजेचे बनले आहे. याच पार्श्वभूमीवर दादरमधील एका जागेबाबत सध्या तांत्रिक अडचणी आणि काही प्रशासकीय बाबींवर पक्षांतर्गत पातळीवर खल सुरू आहे. या त्रुटी लवकरच दूर करून अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.



ठाकरेंच्या वर्चस्वाला आव्हान
एकीकडे खासदार, आमदार आणि तळागाळातील कार्यकर्ते पक्ष सोडत असतानाच, आता मुंबईत प्रति-शिवसेना भवन उभे राहणे हा उबाठा गटासाठी फार मोठा धक्का मानला जात आहे. दादर हे शिवसेनेचे हृदयस्थान मानले जाते, तिथेच शिंदेंच्या शिवसेनेचे पाऊल पडल्यास ठाकरेंच्या वर्चस्वाला हे आव्हान ठरणार आहे. या नव्या सेनाभवनाच्या माध्यमातून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात संघटनात्मक कामकाज अधिक गतिमान करण्याचा शिवसेनेचा निर्धार असला, तरी अद्याप या नियोजित प्रकल्पाबाबत पक्षाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
Comments
Add Comment

PUC Certificate : सर्व वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! PUC साठी आता मोजावे लागणार 'इतके' रुपये; जाणून घ्या सविस्तर

मुंबई :  महाराष्ट्र परिवहन विभागाने राज्यातील वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच PUC

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार सरींचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार

Nagpur Gas Leak : नागपुरात मध्यरात्री खळबळ! गाढ झोपेत अचानक श्वास गुदमरला, गॅस गळतीने 40 जण रुग्णालयात

नागपूर : नागपूरमधील गोधणी परिसरात मध्यरात्री जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरिन वायूची गळती झाल्याने मोठी खळबळ

Breaking! अमरावतीच्या डफरिन रुग्णालयातील NICU विभागाला भीषण आग; 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय अर्थात डफरिन रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला

Mazgaon Ganpati : मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीत अंडी फेकल्याचा आरोप; माझगावमध्ये तणाव, पोलिसांकडून तपास सुरू, पहा Video

मुंबई : मुंबईतील माझगाव परिसरात गणपती आगमन मिरवणुकीदरम्यान अंडी आणि दगडफेक झाल्याच्या आरोपामुळे काही काळ

Nitesh Rane : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; मंत्री नितेश राणेंची गर्जना

मुंबई : ही महादेवाची भूमी, इथे आय लव्ह महादेवच चालणार; अशी गर्जना मंत्री नितेश राणे यांनी केली. ते हिंदू रक्षक