अमरावती : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय अर्थात डफरिन रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला असून, 6 बालकांना उपचारासाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मुंबई : मुंबईतील माझगाव परिसरात गणपती आगमन मिरवणुकीदरम्यान अंडी आणि दगडफेक झाल्याच्या आरोपामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. 'माझगावचा ...
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील NICU मध्ये पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. व्हेंटिलेटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्यानंतर स्फोट होऊन आग लागल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. त्यानंतर काही क्षणांतच संपूर्ण विभागात धुराचे लोट पसरले.
या विभागात सुमारे 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. आग आणि धूर दिसताच ड्युटीवरील डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. कर्मचाऱ्यांनी अनेक बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत 3 चिमुकल्यांचा जीव गेला.
6 बालकांवर उपचार सुरू
आगीत जखमी झालेल्या तसेच धुरामुळे त्रास झालेल्या 6 बालकांना तातडीने सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली.
दरम्यान, शासकीय रुग्णालयातील NICU सारख्या अतिसंवेदनशील विभागात आग लागल्याने रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्था आणि विद्युत यंत्रणेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. आगीचे नेमके कारण आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा तपास सुरू आहे.