Buldhana : राज्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील दुसरबीड परिसरात भरधाव फॉर्च्यूनर कारने समोर धावणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर दोन लहान मुले आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. सय्यद आसिफ सय्यद उमर हे पत्नी गुलसितान बी आणि कुटुंबासह नागपूरहून छत्रपती संभाजीनगरकडे (Chhatrapati Sambhajinagar) जात होते. समृद्धी महामार्गावरील दुसरबीडजवळ त्यांच्या फॉर्च्यूनर वाहनाने समोरील ट्रेलरला पाठीमागून धडक दिली. धडक इतकी भीषण होती की डॉ. आसिफ आणि त्यांच्या पत्नीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांच्या गाडीचा चालक आणि दोन लहान मुले जखमी झाले आहेत. हे कुटुंब नागपूरवरून संभाजीनगर छत्रपती संभाजी नगरच्या दिशेने जात होते.
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनील तटकरे आणि गोगावलेंमध्ये बैठक मुंबई : दीड वर्षांपासून प्रलंबित असलेला रायगडच्या ...
मुंबईतील द्रुतगती महामार्गावर अपघात
मुंबईतील पहिल्या पावसात पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली. बोरिवली देवीपाडा मेट्रो स्टेशनजवळ (Borivali Devipada Metro Station) सकाळी 11 वाजता भरधाव टेम्पोचा अपघात झाला. अंधेरीहून दहिसरच्या दिशेने जाणारा टेम्पो डिव्हायडर ओलांडून विरुद्ध लेनमध्ये घुसला, टेम्पोची 5 ते 6 वाहनांना जोरदार धडक बसली असून अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ पाहायला मिळाला. घटनेची माहिती मिळताच कस्तुरबा मार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले, अपघातामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यात आली असून टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.






