दोन जागांबाबत चाचपणी; संघटनात्मक वाढीसाठी मध्यवर्ती मुख्यालयाची गरज
मुंबई : ऑपरेशन टायगर यशस्वी करून उबाठा गटात दोनवेळा फूट पाडणाऱ्या शिवसेनेचा विस्तार दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे राजधानी मुंबईत नेते, पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी हक्काचे आणि सुसज्ज मध्यवर्ती कार्यालय असावे, असा उपमुख्यमंत्री तथा मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा मानस आहे. त्यानुषंगाने वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) आणि दादरमध्ये जागांची चाचपणी करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दादरमध्ये उभारलेल्या सेनाभवनाच्या धर्तीवर ही वास्तू असेल, अशी माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.
नवी दिल्ली : हरियाणातील सरकारी निधीच्या गैरव्यवहार प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मोठी कारवाई करत ज्येष्ठ आयएएस अधिकारी पंकज अग्रवाल यांना ...
नव्या ‘सेनाभवना'साठी मुंबईत दोन जागांची प्राथमिक पाहणी झाली आहे. यातील पहिली जागा वांद्रे-कुर्ला संकुलात असून ती उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री' निवासस्थानापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे सुरुवातीला या जागेची मोठी चर्चा होती. मात्र, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे आणि खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांचे मत वेगळे असल्याचे समजते. "शिवसेना (shivsena) हा मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि अस्मितेसाठी स्थापन झालेला पक्ष आहे. कॉर्पोरेट कार्यालयांनी व्यापलेल्या बीकेसीमधून पक्षाचे मुख्य कार्यालय चालवणे योग्य ठरणार नाही. त्याऐवजी शिवसेनेच्या परंपरेशी, इतिहासाशी आणि चळवळीशी जोडलेल्या मराठमोळ्या दादर परिसरातच हे भव्य मुख्यालय असायला हवे," अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळेच दादरमधील जागेला पक्ष नेतृत्वाकडून अधिक प्राधान्य आणि पसंती मिळत आहे.
लखनऊ(Lucknow) : अलीगंज (सेक्टर-डी) येथे एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरले आहे. या दुर्दैवी घटनेत १५ निष्पाप ...
जून २०२२ मधील उठावानंतर राज्यातील विविध जिल्ह्यांत, तालुक्यांत आणि गावागावांत शिवसेनेचे जाळे वेगाने विस्तारत आहे. नवनवीन कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इतर पक्षांतील नेत्यांचे 'इनकमिंग (incoming)' सातत्याने सुरू आहे. त्यात भर म्हणजे ऑपरेशन टायगर अंतर्गत ६ खासदार शिवसेनेत दाखल झाल्याने पक्षाचे बळ वाढले आहे. अशा स्थितीत पक्षाची ध्येयधोरणे ठरवण्यासाठी, संघटनात्मक बैठकांसाठी आणि एकूणच प्रशासकीय कामकाजासाठी एका हक्काच्या आणि भव्य मुख्यालयाची कमतरता पक्षाला जाणवत होती. मुंबई(mumbai) ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने आणि मुंबईवर राजकीय पकड मजबूत ठेवण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात सुसज्ज कार्यालय असणे अत्यंत गरजेचे बनले आहे. याच पार्श्वभूमीवर दादरमधील एका जागेबाबत सध्या तांत्रिक अडचणी आणि काही प्रशासकीय बाबींवर पक्षांतर्गत पातळीवर खल सुरू आहे. या त्रुटी लवकरच दूर करून अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
भाईंदर : शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका बसला मागून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या ...





