Fire Accident :लखनऊ कोचिंग क्लास आगप्रकरणी चौघांना अटक, चार अधिकारी निलंबित

लखनऊ(Lucknow) : अलीगंज (सेक्टर-डी) येथे एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश हादरले आहे. या दुर्दैवी घटनेत १५ निष्पाप विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला असून, ९ जण गंभीर जखमी आहेत. या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (adityanath) यांनी तातडीने कारवाई करत चार आरोपींना अटक केली असून, निष्काळजीपणा करणाऱ्या चार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.



घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी त्यांचे नियोजित दौरे रद्द करून तातडीने लखनऊ गाठले. त्यांनी सर्वप्रथम घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि त्यानंतर केजीएमयू ट्रॉमा सेंटरमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये, तर जखमींना ५०-५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तपासात आढळलेल्या निष्काळजीपणामुळे गौरव कुमार , कमलेंद्र कुमार सिंह, अनिल कुमार आणि प्रमोद पांडे(pramod pande) या चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.





विशेष तपास पथकाची स्थापना
प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एसीएस अमृत अभिजात आणि एडीजी प्रवीण कुमार यांच्या नेतृत्वाखाली दोन सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाला येत्या सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पोलिसांनी रामकृष्ण उपाध्याय, वीरेंद्र प्रसाद शुक्ला, तुषार कृष्णा जायसवाल आणि सुरेश कुमार साहू या चार आरोपींना अटक केली आहे.



इमारतीतील गंभीर अनियमितता
तपासात असे समोर आले आहे की, संबंधित इमारत केवळ 'निवासी' वापरासाठी मंजूर होती, तरीही तिथे अनधिकृतपणे कोचिंग सेंटर चालवले जात होते. २०१६ मध्येच लखनऊ विकास प्राधिकरणाने या इमारतीवर कारवाईचे आदेश दिले होते, मात्र ते आदेश नंतर रद्द करण्यात आले होते. इमारतीचे फायर एनओसी, एलडीए आणि वीज विभागाची भूमिका या सर्व बाबींची एसआयटी आता सखोल चौकशी करणार आहे. या तपासणीत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग स्पष्ट होण्याची शक्यता आहे. अलीगंज पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

Piyush Goyal : मंत्री पीयूष गोयल सोमवारपासून चार दिवसांच्या जपान दौऱ्यावर

नवी दिल्ली : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, 24 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जपानला भेट देणार आहेत. या

AK-203 Sher Rifle : संरक्षण उत्पादनात भारताची झेप; स्वदेशी AK-203 रायफलची यशस्वी निर्मिती

नवी दिल्ली : स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. ‘मेक इन इंडिया’

Laptop Fire on Flight : हवेतच लॅपटॉपने घेतला पेट; विमानातील ५ प्रवासी जखमी, थरारक घटना

नवी दिल्ली : अमेरिकेत अटलांटा ते डॅलस असा प्रवास करणाऱ्या विमानात लॅपटॉपला अचानक आग लागल्याने मोठी खळबळ उडाली.

FSSAI Action : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासह बड्या कंपन्यांना FSSAIचा दणका; भ्रामक जाहिरातींवर १५० हून अधिक नोटिस

नवी दिल्ली : नेस्ले, पेप्सिको आणि कोका-कोलासारख्या मोठ्या खाद्य कंपन्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Odisha Ship Accident : बंगालच्या उपसागरात मालवाहू जहाज बुडाले; २४ क्रू मेंबर्सचा शोध सुरू, ओडिशाच्या किनाऱ्याजवळ मोठी दुर्घटना

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात शनिवारी पनामा ध्वज असलेले मालवाहू जहाज बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. हे जहाज

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)