Nagpur Gas Leak : नागपुरात मध्यरात्री खळबळ! गाढ झोपेत अचानक श्वास गुदमरला, गॅस गळतीने 40 जण रुग्णालयात

नागपूर : नागपूरमधील गोधणी परिसरात मध्यरात्री जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरिन वायूची गळती झाल्याने मोठी खळबळ उडाली. विषारी वायूचा प्रभाव झाल्याने प्रकल्पातील कर्मचारी आणि परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. या घटनेत सुमारे 40 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यापैकी 4 ते 5 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. (Nagpur)


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोधणी नगरपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात मध्यरात्रीच्या सुमारास क्लोरिन वायूची गळती सुरू झाली. काही वेळातच वायू आसपासच्या परिसरात पसरला. प्रकल्पातील 8 ते 10 कर्मचारी तसेच जवळच्या परिसरातील 20 ते 25 नागरिकांना अचानक गुदमरल्यासारखे होऊन श्वसनाचा त्रास जाणवू लागला. (Gas Leak)



घटनेची माहिती मिळताच बाधित नागरिकांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. इतरांवरही वैद्यकीय उपचार सुरू आहेत. (Gas Leak News)


दरम्यान, गॅस गळतीची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गळतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले.


सुरक्षेच्या दृष्टीने गळतीच्या ठिकाणापासून सुमारे 200 मीटर परिसर रिकामा करण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी 11 वाजेपर्यंत या परिसरात नागरिकांना प्रवेशास मनाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.


या गॅस गळतीचे नेमके कारण काय, याचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे. घटना नियंत्रणात आणण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. (Maharashtra News)

Comments
Add Comment

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार सरींचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार

Breaking! अमरावतीच्या डफरिन रुग्णालयातील NICU विभागाला भीषण आग; 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय अर्थात डफरिन रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला

Mazgaon Ganpati : मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीत अंडी फेकल्याचा आरोप; माझगावमध्ये तणाव, पोलिसांकडून तपास सुरू, पहा Video

मुंबई : मुंबईतील माझगाव परिसरात गणपती आगमन मिरवणुकीदरम्यान अंडी आणि दगडफेक झाल्याच्या आरोपामुळे काही काळ

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट

Eknath Shinde : पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसोबत, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीची, दीर्घकालीन उपाययोजना

पुणे : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि येथील उद्योगांचे स्थलांतर