PUC Certificate : सर्व वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! PUC साठी आता मोजावे लागणार 'इतके' रुपये; जाणून घ्या सविस्तर

मुंबई :  महाराष्ट्र परिवहन विभागाने राज्यातील वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच PUC प्रमाणपत्राच्या शुल्कात २० टक्क्यांनी वाढ केली आहे. राज्यातील सर्व PUC केंद्रांना सुधारित दर लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता वाहनधारकांना PUC काढण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.



कोणत्या वाहनासाठी किती शुल्क?


नवीन शुल्कानुसार दुचाकी वाहनांसाठी ₹५० ऐवजी ₹६०, पेट्रोलवरील तीनचाकी वाहनांसाठी ₹१०० ऐवजी ₹१२०, पेट्रोल/CNG चारचाकी वाहनांसाठी ₹१२५ ऐवजी ₹१५०, तर डिझेल वाहनांसाठी ₹१५० ऐवजी ₹१८० शुल्क आकारले जाणार आहे.परिवहन विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य PUC केंद्र मालक संघटनेने चाचणी शुल्क वाढवण्याची मागणी केली होती.



PUC केंद्रांवर नवीन दरांचा फलक बंधनकारक


सर्व PUC केंद्रांच्या मालकांना सुधारित शुल्काचे फलक ठळकपणे लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाहनधारकांकडून निर्धारित शुल्कापेक्षा जास्त रक्कम आकारली जाऊ नये, याची दक्षता घेण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.


दरम्यान, परिवहन विभागाच्या ‘वायुवेग’ भरारी पथकांकडून PUC केंद्रांवर या नवीन दरांची अंमलबजावणी होत आहे की नाही, यावर देखरेख ठेवली जाणार आहे.


केंद्रीय मोटार वाहन नियमांनुसार, रस्त्यावर धावणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि CNG वाहनांसाठी वैध PUC प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे वाहनधारकांनी PUC प्रमाणपत्राची वैधता तपासून वेळेत नूतनीकरण करून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; घाटमाथ्यासह विदर्भात जोरदार सरींचा अंदाज

मुंबई : महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार

Nagpur Gas Leak : नागपुरात मध्यरात्री खळबळ! गाढ झोपेत अचानक श्वास गुदमरला, गॅस गळतीने 40 जण रुग्णालयात

नागपूर : नागपूरमधील गोधणी परिसरात मध्यरात्री जलशुद्धीकरण प्रकल्पातून क्लोरिन वायूची गळती झाल्याने मोठी खळबळ

Breaking! अमरावतीच्या डफरिन रुग्णालयातील NICU विभागाला भीषण आग; 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू

अमरावती : अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय अर्थात डफरिन रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागाला

Mazgaon Ganpati : मुंबईत गणपती आगमन मिरवणुकीत अंडी फेकल्याचा आरोप; माझगावमध्ये तणाव, पोलिसांकडून तपास सुरू, पहा Video

मुंबई : मुंबईतील माझगाव परिसरात गणपती आगमन मिरवणुकीदरम्यान अंडी आणि दगडफेक झाल्याच्या आरोपामुळे काही काळ

Nagpur News : महाराष्ट्राची परंपरा लाभलेल्या ढोल ताशाला जागतिक नामांकन

नागपूर : शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग

Dog Attack : दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

बीड : बीड शहरातील शिवतेज नगर भागात रेणू हॉस्पिटल परिसरात घराबाहेर खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर मोकाट