परभणी : महाराष्ट्रातील परभणी (Parbhani) जिल्ह्यातील यशवाडी देवस्थान हनुमान मंदिरात शनिवारी मोठी दुर्घटना घडली. मंदिर परिसरात बांधकाम सुरू असलेल्या सभागृहाचा काही भाग अचानक कोसळल्याने 7 भाविकांचा मृत्यू (7 Death) झाला असून किमान 32 जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. (Parbhani Temple Collapse)
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने भाविक मंदिर परिसरात उपस्थित होते. कार्यक्रम सुरू असतानाच बांधकामाधीन सभागृहाच्या छताचा आणि बांबूच्या आधारावरील संरचनेचा काही भाग अचानक कोसळला. त्यामुळे अनेक भाविक ढिगाऱ्याखाली अडकले. (Temple Roof Collapse)
मुंबई : अन्नसुरक्षेचा (Food Safety) गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. उल्हासनगरमध्ये एका चायनीज सेंटरमधून (Chinese Centre) खरेदी केलेल्या मंचुरियनमध्ये (Manchurian) चक्क ...
घटनेचा सीसीटीव्हीत कैद
घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली असून त्यामध्ये रचना कोसळल्यानंतर भाविकांमध्ये झालेली धावपळ आणि घबराट स्पष्ट दिसत आहे.
दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police), आपत्कालीन पथके आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य (Rescue operation) सुरू करण्यात आले. ढिगारा हटवून अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर करण्यात आले.
रशिया-युक्रेन युद्धाला चार वर्षांहून अधिक काळ उलटल्यानंतर युक्रेनने मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला चढवला आहे. या अभूतपूर्व ...
जखमींवर उपचार सुरु
जखमींना तातडीने रुग्णवाहिकांद्वारे परभणी जिल्हा शासकीय रुग्णालयासह जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, ही दुर्घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे. बांधकामाच्या सुरक्षिततेबाबतही चौकशी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.






