Friday, July 31, 2026

Jalgaon Rain Update : तापी नदीला पूर ! ‘हतनूर’ धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडले; जिल्ह्यात पावसाचा कहर

Jalgaon Rain Update : तापी नदीला पूर ! ‘हतनूर’ धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडले; जिल्ह्यात पावसाचा कहर

Jalgaon Rain Update : जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या (Hatnur Dam) पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा या धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी रोहन घुगे (District Collector Rohan Ghuge) यांनी पाण्याची वाढती आवक लक्षात घेता या धरणाची पाहणी करुन संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. (Jalgaon Rain Update)

‘हतनूर’ धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडले

जळगावसाठी आज रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. त्यानुसार जळगावमध्ये (Jalgaon) गुरुवारपासून सुरू असलेल्या संततधार आणि जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. धरणक्षेत्रात आणि जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने हतनूर धरणाचे (Hatnur Dam) सर्व ४१ दरवाजे उघडले आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी रोहन घुगे (District Collector Rohan Ghuge) यांनी या धरणाची पाहणी करुन संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. (Jalgaon Rain Update)

तापी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन आरोग्य, महसूल, जलसंपदा, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) आणि स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व संबंधित यंत्रणांनी पूर्णतः सज्ज राहून परस्पर समन्वयाने काम करावे, असेही निर्देश दिले. धरणातून होणाऱ्या विसर्गाबाबत वेळोवेळी नागरिकांना माहिती देणे, नदीकाठच्या गावांशी सातत्याने संपर्क ठेवणे, आवश्यक असल्यास तत्काळ स्थलांतराची तयारी ठेवणे तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.  (Jalgaon Rain Update)

धरणातील पाण्याची आवक कायम असल्याने परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार विसर्गात बदल करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. प्रशासनाने तापी नदीकाठच्या (Tapi River) नागरिकांना विनाकारण नदीपात्रात किंवा पुलांवर जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. (Jalgaon Rain Update)

हतनूरमधून ३,१५,२२२ क्युसेक पाण्याचा विसर्ग

हतनूर धरणाची (Hatnur Dam) दुपारी १२ वाजेपर्यंत जलपातळी २११.७५० मीटर इतकी नोंदविण्यात आली असून, पूर्ण जलाशय पातळी २१४.००० मीटर इतकी आहे. धरणातील एकूण पाणीसाठा २६८.५० दशलक्ष घनमीटर (६९.२० टक्के) तर उपयुक्त पाणीसाठा १३५.५० दशलक्ष घनमीटर (५३.१४ टक्के) इतका आहे. सर्व ४१ दरवाजे पूर्णपणे उघडल्याने हतनूरमधून ८,९२६ क्युमेक्स म्हणजेच ३,१५,२२२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >