Saturday, August 1, 2026

Salman Khan and Sanjay Dutt : सलमान खानची संजय दत्तसाठी भावुक पोस्ट; मिठी मारतानाचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले...

Salman Khan and Sanjay Dutt : सलमान खानची संजय दत्तसाठी भावुक पोस्ट; मिठी मारतानाचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले...
मुंबई : बॉलिवूडमध्ये मैत्रीची उदाहरणे दिली जातात, तेव्हा सलमान खान (Salman Khan) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांचे नाव सर्वात वर येते. अनेक वर्षांपासूनची त्यांची ही निखळ आणि घट्ट मैत्री पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. नुकताच सलमानने त्याचा खास मित्र संजय दत्तसोबतचा एक अत्यंत भावुक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्याने सध्या संपूर्ण इंटरनेटचे लक्ष वेधून घेतले आहे.

भावनिक भेटीने जिंकली चाहत्यांची मनं

सलमान खानने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांना अगदी मनापासून घट्ट मिठी मारताना दिसत आहेत. दोघेही अत्यंत साध्या अवतारात म्हणजेच टी-शर्ट आणि जीन्समध्ये पाहायला मिळत आहेत. सलमानच्या डोक्यावर कॅप असून संजय दत्तचा चेहरा पूर्ण दिसत नसला, तरी त्यांच्यातील बॉन्डिंग आणि प्रेम स्पष्टपणे जाणवत आहे. या दृश्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

सलमानची हृदयस्पर्शी कॅप्शन

"बाबा हा नेहमी बाबाच असतो. संजू बाबा आपल्या सर्वांचाच बाबा आहे, आणि आता तर तो आपल्या मुलांचाही बाबा झाला आहे! माझा मोठा भाऊ संजय दत्त... अल्लाह, भगवान, येशू या सर्वांनी या माणसाला नेहमी सुखी ठेवावं. आय लव्ह यू बाबा..."

वाढदिवसानिमित्त घेतलेली ही विशेष भेट ?

 
View this post on Instagram
 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

संजय दत्तचा वाढदिवस २९ जुलै रोजी पार पडला. सोशल मीडियावर नेटकरी असा अंदाज लावत आहेत की, सलमान खान आपल्या या लाडक्या भावाला आणि मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देण्यासाठीच प्रत्यक्ष भेटायला गेला असावा. व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपल्या जिगरी मित्राची भेट घेण्याच्या सलमानच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव

सलमान खानची ही पोस्ट पाहता पाहता तुफान व्हायरल झाली असून, कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी त्यांच्या 'साजन' आणि 'चल Mere Bhai' या गाजलेल्या सिनेमांतील जुने फोटो कमेंट्समध्ये शेअर करत या जोडीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. "बॉलिवूडची खरी आणि अतुट जोडी" अशा शब्दांत नेटकरी या दोन महानायक मित्रांचे कौतुक करत आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >