लोणी काळभोर (पुणे): पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय मंदिराच्या गर्भगृहाचे नूतनीकरण आणि आवश्यक डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या कालावधीत भाविकांची सुरक्षा आणि कामात कोणताही व्यत्यय येऊ नये, यासाठी मंदिर प्रशासनाने १८ जुलै २०२६ पर्यंत मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
वडोदरा : गुजरात राज्याला (Gujrat News) हादरवून सोडणारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची घटना बुधवारी पहाटे घडली आहे. वडोदरा-हालोल महामार्गावर भरधाव ...
काय आहे मंदिर प्रशासनाचा निर्णय?
ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, १८ जून २०२६ ते १८ जुलै २०२६ या एक महिन्याच्या कालावधीत रामदरा मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद राहील. या काळात मंदिराच्या गर्भगृहाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे या दरम्यान भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
कॅलिफोर्निया :फिफा वर्ल्ड कप २०२६ च्या सहाव्या दिवशी ऑस्ट्रियाने जॉर्डनला हरवत फिफा वर्ल्ड कपच्या आपल्या इतिहासात ३६ वर्षांनंतर एक सामना जिंकला आहे. ...
धार्मिक विधींवरही निर्बंध
केवळ दर्शनच नाही, तर मंदिराच्या आवारात कोणतीही पूजा, धार्मिक विधी किंवा उत्सव साजरे करण्यासही या कालावधीत मनाई करण्यात आली आहे. भाविकांनी या काळात दर्शनासाठी मंदिराच्या दिशेने प्रवास करणे टाळावे आणि गर्दी करू नये, असे आवाहन तीर्थक्षेत्र रामदरा शिवालय ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
कॅनडा : मंगळवार, १६ जून रोजी, कॅनडातील टोरोंटो स्टेडियमवर नेदरलँड्स आणि कॅनडा यांच्यात एकदिवसीय सामना खेळला गेला. नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम ...
प्रशासनाचे भाविकांना आवाहन
तिर्थक्षेत्र रामदरा शिवालय ट्रस्टचे अध्यक्ष १००८ श्री महंत हेमंत पुरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे निर्णय घेण्यात आले आहेत. दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा ट्रस्टचा प्रयत्न आहे. काम पूर्ण झाल्यानंतर मंदिर पुन्हा कधी खुले केले जाईल, याची अधिकृत घोषणा व्यवस्थापनाकडून नंतर केली जाईल.
मंदिर बंद असल्यामुळे भक्तांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. तरीही, सर्व भक्तगण, भाविक आणि शिष्यगणांनी या कालावधीत सहकार्य करावे आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.






