Monday, June 15, 2026

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीकडून पुन्हा निराशा! तीच चूक नडली; श्रीलंका 'अ' विरुद्ध २१ धावांवर बाद

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीकडून पुन्हा निराशा! तीच चूक नडली; श्रीलंका 'अ' विरुद्ध २१ धावांवर बाद

भारतीय क्रिकेटमधील युवा सनसनाटी आणि आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) याला श्रीलंका 'अ' संघाविरुद्धच्या तिरंगा मालिकेत पुन्हा एकदा मोठी खेळी करता आली नाही. सलग दुसऱ्या सामन्यात तो स्वस्तात बाद झाला. पहिल्या सामन्यात अवघ्या १४ धावांवर बाद झालेल्या वैभवने यावेळी २१ धावांची खेळी केली, मात्र त्याची खेळी पुन्हा एकदा मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचू शकली नाही. (Vaibhav Sooryavanshi)

आयपीएल २०२६ मध्ये तब्बल ७२ षटकार ठोकून चर्चेत आलेल्या वैभवला मागील दोन सामन्यांत एकही षटकार मारता आला नव्हता. मात्र या सामन्यात त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेत षटकारांचा दुष्काळ संपवला. १४ चेंडूंतील २१ धावांच्या खेळीत त्याने ३ चौकार आणि १ षटकार लगावला. (Vaibhav Sooryavanshi)

भारत 'अ' संघाला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागली. वैभव सूर्यवंशी आणि प्रभसिमरन सिंग यांनी डावाची सुरुवात केली. पहिल्या षटकात सावध खेळ केल्यानंतर दुसऱ्या षटकात वैभवने आक्रमक फटकेबाजी करत एका षटकातच १७ धावा चोपल्या. त्याने चौकार, षटकार आणि पुन्हा चौकार लगावत गोलंदाजांवर दबाव निर्माण केला. (Vaibhav Sooryavanshi)

मात्र चौथ्या षटकात त्याची तीच जुनी कमकुवत बाजू पुन्हा समोर आली. ऑफ स्टंपच्या बाहेर उसळी घेणाऱ्या चेंडूवर पायांची हालचाल न करता फटका मारण्याचा प्रयत्न त्याला महागात पडला. चेंडू बॅटच्या बाहेरील कडेला लागून पॉइंटच्या दिशेने हवेत गेला आणि वानुजा सहानने शानदार झेल घेत वैभवची खेळी संपवली. गेल्या काही सामन्यांपासून ऑफ स्टंपबाहेरील चेंडूंवर निष्काळजी फटके मारून विकेट गमावण्याची सवय वैभवला महागात पडताना दिसत आहे. त्यामुळे त्याच्या तांत्रिक खेळावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (Vaibhav Sooryavanshi)

तिरंगा मालिकेत आतापर्यंत वैभव सूर्यवंशीला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्याने मालिकेत एकूण ७९ धावा केल्या असून त्यामध्ये १५ चौकार आणि केवळ १ षटकाराचा समावेश आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाला त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असताना वैभवला मात्र सातत्य राखण्यात अपयश येत आहे. आता मालिकेतील पुढील सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशी आपल्या फलंदाजीतील त्रुटी दूर करून मोठी खेळी करतो का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (Vaibhav Sooryavanshi)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >