सिंधुदुर्ग : पावसाळी पर्यटन हंगामाला सुरुवात होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना आंबोली घाटात मुख्य धबधबा परिसरात दरड कोसळून मोठे दगड रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु अचानक झालेल्या दरड कोसळीमुळे वाहतूक मात्र विस्कळीत झाली. पावसाळा सुरु होताच पर्यटकांनी कोकणात पर्यटनासाठी तुफान गर्दी असते.
मुंबई : दिव्यांगजनांचे पुनर्वसन, आरोग्य सेवा आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी समर्पित असलेल्या भारतातील अग्रगण्य संस्थांपैकी एक असलेल्या 'नारायण सेवा ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आंबोली घाटात आज मुख्य धबधबा परिसरात अचानक दरड कोसळून मोठे दगड रस्त्यावर आले. मुख्य धबधब्यासमोरील सार्वजनिक शौचालयाच्या परिसरात ही घटना घडली. त्यामुळे काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर पडलेले मोठे दगड बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
मुंबई : मुंबई टी-२० लीग २०२६ चा अंतिम सामना (१३ जून ) मराठा रॉयल्स आणि ARCS Andheri यांच्यात खेळला गेला. हा सामना मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर झाला. या सामन्यात ...
सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी कोणतेही वाहन दगडांच्या तडाख्यात सापडले नाही आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत पर्यटकांची गर्दी वाढण्यापूर्वीच घडलेल्या या घटनेमुळे घाटातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.आंबोली घाटातील दरड कोसळल्यानंतरचे दृश्य, रस्त्यावर पडलेले दगड आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरू असलेली प्रशासनाची कार्यवाही.






