Sunday, June 14, 2026

IND vs PAK Women's T20 World Cup 2026 : भारत-पाकिस्तान महामुकाबल्यापूर्वीच वातावरण तापलं; हरमनप्रीतचं मोठं वक्तव्य

IND vs PAK Women's T20 World Cup 2026 : भारत-पाकिस्तान महामुकाबल्यापूर्वीच वातावरण तापलं; हरमनप्रीतचं मोठं वक्तव्य

Birmingham : महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये आज (14 जून) भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना होणार आहे. बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ आज आपल्या टी-२० विश्वचषकाच्या मोहिमेची सुरुवात करणार आहेत. भारत-पाकिस्तान सामने नेहमीच रोमांचक असतात. मात्र आजच्या सामन्यापूर्वीच भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरचे विधान व्हायरल होत आहे. दोन्ही देशांतील राजकीय तणावामुळे अनेक वर्षांपासून द्विपक्षीय मालिका होत नसल्याने भारत आणि पाकिस्तानची गाठ फक्त आयसीसी किंवा बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्येच पडते. त्यामुळे या सामन्याला नेहमीच विशेष महत्त्व असते.

हँडशेक वादावर हरमनप्रीतची स्पष्ट भूमिका

सामन्यापूर्वी भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिला पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हरमनप्रीतने अत्यंत संयमी प्रतिक्रिया दिली. आम्ही येथे क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहोत. संघात इतर कोणत्याही विषयावर चर्चा होत नाही. आमचं पूर्ण लक्ष फक्त सामन्यावर आणि संघाच्या कामगिरीवर आहे.तिच्या या वक्तव्यामुळे भारतीय संघाचे लक्ष केवळ क्रिकेटवर असल्याचे स्पष्ट झाले आहे.(sports)

भारताचे पाकिस्तानवर वर्चस्व

महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्ध दबदबा राहिला आहे. दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड आकडेवारीत भारत 13-3 ने आघाडीवर आहे. तसेच महिला टी-20 विश्वचषकातही भारताने पाकिस्तानविरुद्ध 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत. मात्र, आकडेवारी काहीही असली तरी भारत-पाकिस्तान सामना म्हणजे नेहमीच रंगतदार ठरतो.

हा सामना एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतो - हरमनप्रीत

भारत-पाकिस्तान सामन्याच्या दबावाबद्दल बोलताना हरमनप्रीत म्हणाली, लहानपणापासून भारत-पाकिस्तान सामने पाहताना दबाव जाणवत आला आहे. आता खेळाडू म्हणून तो आणखी जास्त जाणवतो. पण आम्ही संघातील खेळाडूंना हा सामना एन्जॉय करण्याचा सल्ला देतो. शेवटी हा देखील एक क्रिकेट सामना आहे. भारतीय संघाला विश्वचषकाची सुरुवात विजयाने करायची आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला पराभूत करून स्पर्धेत दमदार सुरुवात करण्याचा संघाचा निर्धार आहे. हरमनप्रीत म्हणाली,"पहिला सामना संपूर्ण स्पर्धेचा सूर ठरवतो. आम्ही या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहोत आणि सकारात्मक मानसिकतेसह मैदानात उतरणार आहोत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >