धर्मशाला: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील सलामीचा एकदिवसीय सामना हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर होणार आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे नाणेफेकही होऊ शकलेली नाही. पावसाचा विचार करता २०-२० षटकांचा सामना पूर्ण करण्यासाठी कट ऑफ वेळ जाहीर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी दोन वाजल्यापासून ओवर्स मध्ये कपात करण्यास सुरुवात झाली आहे. जर पावसाने विश्रांती घेतली, तर २०-२० षटकांचा सामना खेळवला जाईल. मात्र २० षटकांचा सामना होण्यासाठी संध्याकाळी ६ : ३२ ला सामना सुरू होण्याची आवश्यकता आहे.
धर्मशाळेत टॉसही लांबला धर्मशाला: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द होण्याची शक्यता ...
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्प आणि उड्डाणपूल बांधकामामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच ...
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), के.एल. राहुल, यशस्वी जयसवाल, ईशान किशन, श्रेयस अय्यर, वॉशिंगटन सुंदर, नीतीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, गुरनूर बराड, प्रसिद्ध कृष्णा आणि प्रिंस यादव.
🚨 IND vs AFG 1st ODI Update: ⏰ Cut-off time for a 20-over match: 6:32 PM IST pic.twitter.com/JfmHAXpjsP
— CricketGully (@thecricketgully) June 13, 2026
वनडे मालिकेसाठी अफगाणिस्तान संघ: रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम जादरान, सेदिकुल्लाह अटल, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), रहमत शाह, इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), अजमतुल्लाह उमरजई, मोहम्मद नबी, राशिद खान, नांगेयालिया खरोती, ए.एम. गजनफर, बिलाल सामी, दरविश रसूली, फरीद अहमद मलिक आणि जिया उर रहमान शरीफी





