Tuesday, August 11, 2026

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

Abishek Porel : क्रिकेटपटू अभिषेक पोरेल हुगळीत अटक; कथित बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई

दिल्ली कॅपिटल्सचा स्टार खेळाडू आणि बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेल याला हुगळी येथे एका कथित बलात्कार प्रकरणात मंगळवारी अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील मोगरा पोलीस ठाण्यात एका वैद्यकीय विद्यार्थिनीने अभिषेक पोरेलविरुद्ध तक्रार दाखल केली होती. पीडितेच्या आरोपानुसार, ती आणि पोरेल जवळपास तीन वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि नात्यात होते. त्यांनी लग्नाचे ठरवले होते. याच लग्नाच्या खोट्या आश्वसनाखाली पोरेलने आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप तिने केला आहे. मात्र, सुमारे दीड वर्षांपूर्वी त्यांच्यात आपापसात मतभेद निर्माण झाले, ज्यामुळे दुरावा वाढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण याआधीही पोलिसांच्या निदर्शनास आले होते, परंतु त्या वेळी कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

उच्च न्यायालयाचे आदेश आणि पोलिसांची कारवाई

या प्रकरणाला तेव्हा अधिक गंभीर वळण मिळाले, जेव्हा पीडितेचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर किंवा इतरत्र लीक करण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी सुनावणी घेतल्यानंतर कलकत्ता उच्च न्यायालयाने क्रिकेटपटू अभिषेक पोरेलला तात्काळ अटक करण्याचे कठोर आदेश दिले होते. न्यायालयाच्या निर्देशानंतर मोगरा पोलिसांनी पोरेलविरुद्ध अजामीनपात्र कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल तपासाचा एक भाग म्हणून पोलिसांनी पोरेलला त्याचे सर्व स्टोरेज डिव्हाइसेस आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे तातडीने जप्त करून जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे क्रीडाविश्वात एकच चर्चा सुरू असून पुढील कायदेशीर प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >