कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्प आणि उड्डाणपूल बांधकामामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच मुख्य एसटी आगाराचे तात्पुरते स्थलांतर विठ्ठलवाडी येथे करण्यात आल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या हजारो प्रवाशांना गेल्या सहा महिन्यांपासून मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
कल्याण पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांना आता थेट एसटी आगारात उतरता येत नसून अनेक बसगाड्या पत्रीपूल, नेतिवली नाका किंवा सूचक नाका परिसरातच प्रवाशांना उतरवत आहेत. परिणामी सामानासह प्रवास करणाऱ्या नागरिकांना अतिरिक्त खर्च आणि त्रास सहन करावा लागत आहे.
गृह राज्यमंत्री पंकज भोयर; गृह विभागाकडून सायबर पोलिसांना आदेश जारी मुंबई : अश्लील आणि विकृत विनोदांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँडअप ...
रिक्षासाठी मोजावे लागतात अतिरिक्त पैसे :
एसटी बसमधून अर्ध्या रस्त्यात उतरवल्यानंतर प्रवाशांना कल्याण रेल्वे स्थानक किंवा शहरातील अन्य भागात पोहोचण्यासाठी रिक्षाचा आधार घ्यावा लागतो. यासाठी १०० ते १५० रुपये भाडे आकारले जात असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. विशेषतः कोकण, अहिल्यानगर, बीड, उस्मानाबाद आणि इतर दूरवरच्या भागांतून येणाऱ्या प्रवाशांकडे मोठ्या प्रमाणात सामान असते. अशा वेळी अर्ध्या रस्त्यात उतरावे लागल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे.
पाच वर्षांपासून प्रकल्प रखडला :
बाहेरगावच्या गाड्यांना प्रवेशबंदी :
अहिल्यानगर, बीड, धाराशिव, कोकण आणि अन्य भागांतून येणाऱ्या एसटी बसला सध्या कल्याण डेपोमध्ये प्रवेश दिला जात नाही. या बसगाड्या गोविंदवाडी किंवा पत्रीपूल मार्गे थेट विठ्ठलवाडी आगारात पाठवल्या जातात. यामुळे कल्याण पश्चिमेकडे जाणाऱ्या प्रवाशांना मधल्या मार्गात उतरावे लागते आणि त्यानंतर खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागते.
केरळमध्ये वेळेवर दाखल झाल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे ६ जून रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर मान्सूनचा पुढील प्रवास मंदावला असून ...






