धर्मशाळेत टॉसही लांबला
धर्मशाला: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द होण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील सलामीचा एकदिवसीय सामना हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर होणार आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे नाणेफेकही होऊ शकलेली नाही. खेळपट्टी आणि संपूर्ण मैदान झाकण्यात आल्याने खेळाडू आणि चाहत्यांमधील उत्सुकता वाढली आहे.
🚨 Rain plays spoilsport in Dharamshala 🚨
— Star Sports (@StarSportsIndia) June 13, 2026
The toss for the 1st #INDvAFG ODI has been delayed due to wet weather. 🌧️#INDvAFG | 1st ODI | LIVE NOW 👉 https://t.co/wBah2REzpB pic.twitter.com/XUp44xvdO7
पावसामुळे पहिली सामना रद्द होईल का?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेतील पहिला सामना भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. आगामी २०२७ विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ही मालिका महत्त्वपूर्ण आहे. सामना सुरू होण्याच्या काही तास आधी, धरमशालामध्ये पावसाला सुरुवात झाली आणि हळूहळू त्याचा जोर वाढला. पाऊस वाढल्याने मैदानाचा सर्व भाग पाण्याखाली गेला. परिणामी, नाणेफेक वेळेवर होऊ शकली नाही.
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्प आणि उड्डाणपूल बांधकामामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. त्यातच ...
हवामान खात्याकडून धोक्याचा इशारा.
धर्मशाळा तिच्या निसर्गरम्य परिसरासाठी प्रसिद्ध असली तरी, येथील हवामान अचानक बदलू शकते. हिमाचल प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. गुरुवारी धर्मशाळा आणि आसपासच्या परिसरातही मुसळधार पाऊस झाला. आयपीएलचे माजी अध्यक्ष अरुण धुमाळ यांनी सोशल मीडियावर पावसाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले असून, त्यामुळे आजच्या सामन्यावर परिणाम होऊ शकतो हे स्पष्ट झाले आहे. AccuWeather च्या हवामान अंदाजानुसार, आज धर्मशाळेत पाऊस पडण्याची ८० टक्के शक्यता आहे. विशेष म्हणजे, दुपारी २ ते ४ च्या दरम्यान सर्वाधिक पाऊस अपेक्षित आहे. सामना नुकताच सुरू होणार असल्याने क्रिकेट चाहते अधिकच चिंतेत आहेत. रात्रीच्या सत्रातही हलक्या सरींची शक्यता आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी पुष्टी केली आहे की अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपवण्यासाठीचा करार जवळपास झाला आहे. ही पोस्ट ...
पावसामुळे ओवर कमी होतील का ?
जर पाऊस वेळेवर थांबला आणि खेळपट्टी खेळण्यायोग्य झाली, तर पंच डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) नियमानुसार षटकांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतात. अशा परिस्थितीत, मूळ ५० षटकांच्या सामन्याऐवजी २० ते ३० षटकांचा सामना खेळला जाऊ शकतो. तथापि, जर पाऊस सतत पडत राहिला आणि खेळपट्टीला सुकण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, तर सामना रद्द होण्याची शक्यता असते.






