- मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून मुंबईकरांना आवाहन
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही ९ ते १७ ऑगस्ट २०२६ या कालावधीदरम्यान 'घरोघरी तिरंगा' अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे. यंदाच्या अभियानाचे विशेष आकर्षण म्हणजे 'वंदे मातरम्' या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकवून या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (Har Ghar Tiranga) केंद्र शासनाकडून सन २०२२ पासून 'घरोघरी तिरंगा' अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे. यंदा 'वंदे मातरम्' या गीताला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता वाढविण्यासाठी देशभर विविध उपक्रम राबविले जात आहेत. (Har Ghar Tiranga)
- तलावांमधील पाणी अद्यापही ९० टक्क्यांच्या पुढे जाईना मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्याची ...
या अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत 'घरोघरी तिरंगा' अभियान राबविले जाणार आहे. मुंबई महानगरातही हे अभियान व्यापकपणे आणि अत्यंत उत्साहात राबविण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी दिले आहेत. (Har Ghar Tiranga) 'घरोघरी तिरंगा' अभियान अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागांमध्ये (वॉर्ड) तिरंगा रॅली आणि ई-बाइक रॅली, वंदे मातरम् प्रदर्शन, मातरम् रांगोळी आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित केले जातील, ज्यामध्ये वंदे मातरम् गीत गायन करण्यात येईल. (Har Ghar Tiranga)
- मुंबई महापालिकेला येथील रहिवाशांना बाहेर काढायचा अधिकार काय? - जिल्हाधिकारी तोंडावर बोट ठेवून गप्प बसले, महापालिका होते बदनाम मुंबई (सचिन ...
नागरिकांनी राष्ट्रध्वजासोबत सेल्फी काढून https://harghartiranga.com या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावी. यावर्षी सेल्फीसोबत 'वंदे मातरम्' गीताचे बोल असलेली विशेष व्हिडिओ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभियानाबाबत अधिक माहितीसाठी आणि स्वयंसेवक नोंदणीसाठी https://harghartiranga.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. मुंबईतील नागरिकांनी या राष्ट्रीय अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होऊन राष्ट्रप्रेमाचे दर्शन घडवावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. (Har Ghar Tiranga)




