नवी दिल्ली : मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. दरम्यान, आखाती प्रदेशात भारतीय खलाशांना घेऊन जाणाऱ्या टँकर्सवर हल्ले झाले आहेत. भारत सरकारने या प्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे. भारताने या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्यांना अत्यंत चिंताजनक म्हटले असून, असे हल्ले तात्काळ थांबवण्याचे आवाहन केले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला, ओमानच्या किनाऱ्याजवळ अमेरिकी सैन्याने हल्ला केलेल्या एका जहाजावरील तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला आहे, जे सुरुवातीला बेपत्ता असल्याचे वृत्त होते. (India Breaks Silence On Gulf Conflict)
ओमान : इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर ओमानच्या समुद्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळ एका रासायनिक आणि तेलवाहू ...
जयस्वाल म्हणाले, "आम्ही ओमानच्या किनाऱ्याजवळ जहाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला, ज्यात दुर्दैवाने तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. आमचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आम्ही यूएस सीडीएला येथे बोलावले. या प्रदेशात जहाजांवर होणारे सततचे हल्ले अत्यंत चिंताजनक असून ते या प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षाचा थेट परिणाम आहेत. हे हल्ले थांबवलेच पाहिजेत. आम्ही संवाद आणि राजनैतिक संबंधांचे आवाहन करतो, जेणेकरून या प्रदेशात लवकरच शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होऊ शकेल." (India Breaks Silence On Gulf Conflict)
Pakistan Army Helicopter Crash : पाकव्याप्त काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पाकव्याप्त मुझफ्फराबादमध्ये पाकिस्तानच्या लष्कराचे एमआय-17 (Mi-17) हेलिकॉप्टर कोसळल्याची ...






