Wednesday, August 12, 2026

Jalgaon Crime : नवरा-बायकोमधील भांडणाचा धक्कादायक शेवट ! आई अन् मुलाने थेट...

Jalgaon Crime : नवरा-बायकोमधील भांडणाचा धक्कादायक शेवट ! आई अन् मुलाने थेट...

Jalgaon Crime News : नवरा बायको यांच्यामध्ये होणारे आणि नंतर टोकाले पोहोचलेले वाद क्षणाधार्त आयुष्याची कशी राखरांगोळी करू शकतात याचा प्रत्यय चाळीसगावच्या आंबेहोल गावात आला आहे. जळगावच्या चाळीसगाव (Chalisgaon) ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आंबेहोल गावात एक अतिशय खळबळजनक घटना घडली आहे. आंबेहोल येथे गहाण ठेवलेली मोटर सायकल सोडविण्यासाठी पैसे मागण्याच्या वादातून आई आणि तिच्या 17 वर्षीय मुलाने पतीची हत्या केली आहे. करणसिंग रामसिंग पवार असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Chalisgaon Crime News)

नेमकं प्रकरण काय ?

मयत करणसिंग रामसिंग पवार यांनी गहाण ठेवलेली मोटारसायकल सोडवण्यासाठी पत्नी अरुणाबाई करणसिंग पवार यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. आई वडील भांड्यात असल्याचे पाहून पवार यांच्या अल्पवयीन मुलानेही वादात हस्तक्षेप केला. दारू पिऊन त्रास देणे, तसेच परस्पर जमीन विकल्याच्या कारणावरून आधीच पवार कुटुंबात वाद सुरू होते. त्यात पुन्हा पैश्याची मागणी होत असल्याने अरुणाबाई करणसिंग पवार यांनी थेट करणसिंग रामसिंग पवार यांचा गळा आवळला तर मुलाने डोक्यात सायकलचा पंप मारत बापाचीच निर्घृणपणे हत्या केली. सध्या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. (Chalisgaon Crime News)

आई आणि अल्पवयीन मुलगा ताब्यात

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार , या वादात अरुणाबाई यांनी दोरीने करणसिंग यांचा गळा आवळला, तर 17 वर्षीय मुलाने सायकलच्या पंपाने त्यांच्या डोक्यावर मारहाण केली. यात करणसिंग यांचा मृत्यू झाला. दरम्यान, करणसिंग यांचा याआधी देखील दारू पिऊन त्रास देणे तसेच परस्पर जमीन विकल्याच्या कारणावरून कुटुंबात वाद सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. खून झाल्याची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी (Chalisgaon Rural Police) घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अरुणाबाई पवार आणि त्यांच्या 17 वर्षीय मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >