Friday, April 18, 2025
Homeब्रेकिंग न्यूजShivneri Fort Mohal Bees Attack : शिवनेरी किल्ल्यावर आग्या मोहळ मधमाशांचा पर्यटकांवर...

Shivneri Fort Mohal Bees Attack : शिवनेरी किल्ल्यावर आग्या मोहळ मधमाशांचा पर्यटकांवर हल्लाबोल; ५० ते ६० पर्यटक जखमी

पुणे : पुण्यातील जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्यावर (Shivneri Fort) आज रविवार असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले. मात्र, सकाळच्या सुमारास शिवनेरी किल्ल्यावर असणाऱ्या शिवाई मंदिर परिसरात आग्या मोहळाने पर्यटकांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात ५० ते ६० जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवनेरी किल्ल्यावर दुर्गप्रेमींची धावपळ पहायला मिळत आहे.यावेळी अनेक लहान मुले देखील किल्ल्यावर असल्याची माहिती मिळत आहे.

Dehu Tukaram Beej Sohla : देहूनगरीत संत तुकाराम बीज सोहळा उत्साहात साजरा!

मिळालेल्या माहितीनुसार आज रविवार(दि. १६) किल्ले शिवनेरीवरील (Shivneri Fort) शिवाई देवी मंदिर परिसरात आग्या मोहळाच्या (Mohal Bees Attack) माशांनी हल्ला केला असून त्यात ५० ते ६० पर्यटक जखमी झाले आहेत.शिवाई मंदिर हे पूर्णपणे माशांनी भरले असून मंदिरात दुर्गपेमी अडकलले आहेत.तर काही विद्यार्थी गडावर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हल्ला झाल्यानंतर एकच धावपळ सुरू झाली आणि किल्ल्यावरून खाली येण्यासाठी पर्यटक सैरावैरा पळत सुटले.

या घटनेची माहित मिळताच आरोग्य विभागाच्या ॲम्बुलन्स शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी दाखल झाल्या आहेत.पोलिसांनी तातडीने पर्यटकांना गडावरून खाली येण्यास सांगितलं. वनविभागाकडून आग्या मोहळ शांत करण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. आगी मोहोळाचा हा हल्ला असून दगड मारल्यानेच आग्या मोहळ उठळे असल्याचे काही पर्यंटकांकडून सांगण्यात येत आहे. अनेक पर्यटक या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांना ॲम्बुलन्समधून रूग्णालयात दाखल करण्यात आलंय आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -