पुणे : देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या NEET पेपर फुटी प्रकरणात आता सर्वात मोठा स्फोटक खुलासा समोर आला आहे. या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) ताब्यात असलेल्या आरोपी मनीषा हवालदार हिने चौकशीदरम्यान आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, तिने केवळ पेपर फोडल्याची कबुलीच दिली नाही, तर हे संपूर्ण रॅकेट कुणाच्या सांगण्यावरून चालत होते याचाही खुलासा केल्याने तपासाला मोठे वळण मिळाले आहे. (NEET-2026 Paper Leak Case)
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली आहे. ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी आज मुंबईत समर्थकांसह ...
परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांना प्रश्न आणि उत्तरे पुरवल्याचा आरोप :
सीबीआयच्या चौकशीत मनीषा हवालदारने कबूल केल्याचे सांगितले जात आहे की, तिने परीक्षेपूर्वी काही विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र विषयाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे उपलब्ध करून दिली होती. तपास यंत्रणांच्या मते, या प्रश्नपत्रिका आणि माहिती व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुढे पाठवण्यात आली होती. (NEET-2026 Paper Leak Case)
या प्रकरणात मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे या संशयित महिलांशी तिचा सतत संपर्क होता. तिघींमध्ये पेपर फुटीबाबत अनेक वेळा संवाद झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (NEET-2026 Paper Leak Case)
श्रीनगर : उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत दहशतवाद्यांच्या संशयित ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात स्फोटक दारुगोळा ...
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?
घरावर छापा, मोठे पुरावे जप्त :
सीबीआयने मनीषा हवालदारच्या घरावर टाकलेल्या छाप्यात काही संशयास्पद कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि रोकड जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांनी लॅपटॉप, मोबाईल आणि इतर डिजिटल पुरावे ताब्यात घेतले असून त्यातून आणखी विद्यार्थ्यांची नावे आणि पेपर फुटीचे नेटवर्क उघड होण्याची शक्यता आहे. (NEET-2026 Paper Leak Case)
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज म्हणजेच रविवार २४ मे रोजी अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाल्याने राज्याच्या राजकारणात चर्चांना ...
मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी CBIची पथके रवाना :
दरम्यान, या प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर आणि सुरक्षा व्यवस्थेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (NEET-2026 Paper Leak Case)






