Tuesday, March 18, 2025
Homeदेशदिल्लीचा मुख्यमंत्री लवकरच जाहीर होणार, शपथविधीची तारीख आणि ठिकाण ठरले

दिल्लीचा मुख्यमंत्री लवकरच जाहीर होणार, शपथविधीची तारीख आणि ठिकाण ठरले

नवी दिल्ली : दिल्लीची विधानसभा निवडणूक जिंकणाऱ्या भाजपाने मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख आणि ठिकाण जाहीर केले. पण मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर केलेले नाही. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Pune News : एका फ्लॅटमध्ये ३५० मांजरी, पशू संवर्धन विभागाने बजावली नोटीस

हाती आलेल्या माहितीनुसार, दिल्लीचा भावी मुख्यमंत्री २० फेब्रुवारी २०२५ रोजी रामलीला मैदानावर संध्याकाळी भव्य सोहळ्यात पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहे. या सोहळ्यासाठी किमान ३० हजार जणांना आमंत्रण दिले जाणार आहे. सोहळ्यासाठी ४० फूट बाय २४ फूटचा मोठा मंच आणि दोन ३४ बाय ४० फुटांचे मंच उभारले जाणार आहेत. मंचावर १०० ते १५० जणांसाठी बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

महाकुंभात ५१ कोटींहून अधिक भाविकांचे पवित्र स्नान

फेब्रुवारी महिन्यात दिल्लीच्या विधानसभेसाठी निवडणूक झाली. विधानसभेच्या ७० पैकी ४८ जागा भारतीय जनता पार्टीने आणि २२ जागा आम आदमी पार्टीने जिंकला. काँग्रेस पक्ष सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत एकही जागा जिंकू शकलेला नाही. दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीचा पराभव करणाऱ्या भाजपाने दणदणीत विजय मिळवला. हा विजय मिळाला तरी भाजपाने अद्याप मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही.

दिल्ली-NCRमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, काही सेकंदापर्यंत हलली जमीन, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

दिल्लीच्या मुख्यमंत्री या पदासाठी भाजपात सध्या सात नावांची चर्चा आहे. प्रवेश वर्मा, आशीष सूद, रेखा गुप्ता, विजेंद्र गुप्ता, सतीश उपाध्याय, जितेंद्र महाजन, शिखा रॉय या सात जणांपैकी एकाच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री म्हणून होण्याची शक्यता आहे. भाजपाची सोमवारी १७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी एक बैठक होणार आहे. या बैठकीत नेता निवडीच्या मुद्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील भाजपा सरकारमध्ये किती सदस्यांचे मंत्रिमंडळ असेल तसेच कोणाकोणाला मंत्री करावे याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशी समिती स्थापन

भाजपा १९९३ नंतर पहिल्यांदाच दिल्लीत सत्ता स्थापन करणार आहे. त्यांनी मागील १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून सत्तेत असलेल्या आम आदमी पार्टीचा पराभव केला आहे. यामुळे भाजपासाठी दिल्लीतल्या विजयाला विशेष महत्त्व आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -