बिहार : बिहारमधील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) (ICU) लागलेल्या भीषण आगीत चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बचावकार्य (Rescue Operation) अद्याप सुरू असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही दुर्घटना शहरातील प्रसाद हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरील आयसीयूमध्ये पहाटे घडली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
अग्निशमन विभागाला पहाटे ३:५५ मिनिटांनी आपत्कालीन कॉल (Emergency Call) प्राप्त झाला होता. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाने आयसीयूमधून सुमारे पंधरा ते वीस रुग्णांना बाहेर काढले. यापैकी दोन रुग्णांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर रुग्णांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयांत हलविण्यात आले आहे.
चेन्नई : ॲक्शन चित्रपटांमधील (Action Films) थरारक दृश्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत असली तरी त्यामागील मेहनत आणि धोके अनेकदा समोर येत नाहीत. अशाच एका दुर्दैवी ...
प्राथमिक तपासानुसार, शॉर्ट सर्किटमुळे (Short Circuit) आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आगीच्या वेळी आयसीयूमध्ये सुमारे तेरा रुग्ण, तर सीसीयूमध्ये (CCU) काही अन्य रुग्ण उपचार घेत होते. घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल.
दरम्यान, या घटनेच्या अवघ्या एका दिवसापूर्वी दिल्लीतील मालवीय नगर परिसरातील एका हॉटेलला लागलेल्या आगीत एकवीस जणांचा मृत्यू झाला होता, तर २६ जण जखमी झाले होते. हौज रानी परिसरातील ‘फ्लॉरिश स्टे’ या हॉटेलमध्ये सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली होती. त्या वेळी हॉटेलमध्ये सुमारे चाळीस पाहुणे वास्तव्यास होते.
पुणे : आषाढी वारीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू (Dehu) यांनी जगद्गुरू संत तुकाराम ...
दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित इमारतीत प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी केवळ एकच मार्ग होता. तसेच खिडक्या कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या होत्या आणि मुख्य दरवाजा सेन्सरवर आधारित होता. त्यामुळे आग वेगाने पसरल्यानंतर अनेक पाहुण्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.






