Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीनवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशी समिती स्थापन

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरी प्रकरणी चौकशी समिती स्थापन

नवी दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेच्या दुसऱ्या दिवशी, उत्तर रेल्वेने येणाऱ्या काळात अशा प्रकारची कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी अनेक उपाययोजना लागू केल्या आहेत. तसेच अनुचित घटनेची चौकशी करण्यासाठी घोषित केलेल्या दोन सदस्यीय उच्चस्तरीय समितीने आपले काम सुरू केले आहे. समितीमध्ये प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त पंकज गंगवार आणि उत्तर रेल्वेचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक नर सिंग यांचा समावेश आहे.

नवी दिल्ली चेंगराचेंगरी प्रकरण, मृतांच्या कुटुंबियांना १० लाख आणि जखमींना २.५ लाख रूपये मदतीची घोषणा

प्रयागराजच्या दिशेने जाणाऱ्या सर्व विशेष गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वरून चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रयागराजला जाऊ इच्छिणाऱ्या सर्व प्रवाशांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या अजमेरी गेट बाजूने ये-जा करावी. सर्व प्लॅटफॉर्मवरून नियमित गाड्या नेहमीप्रमाणे चालवल्या जातील. याशिवाय, नवी दिल्ली रेल्वे स्थानकात आरपीएफ आणि जीआरपी दलांची तैनाती वाढवण्यात आली आहे. हे कर्मचारी प्रवाशांना त्यांची ट्रेन ज्या प्लॅटफॉर्मवरून सुटणार आहे त्या प्लॅटफॉर्मवर जाण्यास मदत करत आहेत. गर्दीच्या वेळेत कार्यक्षमता वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्याव्यतिरिक्त, प्रयागराजच्या दिशेने होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी उत्तर रेल्वेने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत तीन विशेष गाड्या चालवल्या. यामध्ये प्रयागराज मार्गे दरभंगाला जाणारी एक विशेष ट्रेन आणि प्रयागराजला जाणाऱ्या आणखी दोन विशेष ट्रेनचा समावेश आहे. प्रयागराजला जाणाऱ्या नियमित गाड्यांव्यतिरिक्त, संध्याकाळी गर्दीची मागणी पूर्ण करण्यासाठी आणखी एक विशेष ट्रेन रात्री ९ वाजता सुटणार आहे. प्रयागराजच्या दिशेने जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांची अभूतपूर्व गर्दी लक्षात घेता, भारतीय रेल्वेने महाकुंभ भक्तांसाठी उद्या, म्हणजे १७ फेब्रुवारी रोजी आणखी पाच विशेष गाड्यांचे वेळापत्रक निश्चित केले आहे.

नवी दिल्ली रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरी, १८ जणांचा मृत्यू

अफवांना बळी पडू नये. प्रवासाच्यावेळी अधिकृत घोषणेचे काटेकोरपणे पालन करावे; असे आवाहन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना केले आहे. गर्दीच्या परिस्थितीत प्रवाशांना कोणत्याही चौकशीसाठी आणि मदतीसाठी रेल्वे हेल्पलाइन क्रमांक १३९ सदैव उपलब्ध आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -