पुणे : हडपसरमधील मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये नवव्या मजल्यावर राहणाऱ्या एका महिलेने फ्लॅटमध्ये ३५० मांजरी पाळल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पुणे महानगरपालिकेच्या पशू संवर्धन विभागाने फ्लॅटच्या मालकिणीला नोटीस बजावली आहे. फ्लॅटमधील मांजरींचे ४८ तासांत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे तसेच मांजरींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक ते उपाय करावे, असेही नोटीसद्वारे सांगण्यात आले आहे.
DCM Ajit Pawar Update : उपमुख्यमंत्री अजित पवारांची तब्बेत बिघडली, आजचे सर्व कार्यक्रम रद्द!
महिलेने मांजरींची देखभाल करण्यासाठी घरात पाच – सहा नोकरांची नेमणूक केली आहे. पण एकाच फ्लॅटमध्ये ३५० मांजरी असल्यामुळे प्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता होत होती. सततच्या दुर्गंधीमुळे सोसायटीतले इतर रहिवासी पण त्रस्त झाले होते. रहिवाशांनी वारंवार विनंती करुनही महिला मांजरींची पर्यायी व्यवस्था करणे टाळ होती. अखेर रहिवाशांनी पुणे महानगरपालिकेच्या पशू संवर्धन विभागाला माहिती दिली. यानंतर पशू संवर्धन विभागाने फ्लॅटच्या मालकिणीला नोटीस बजावली.
महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार साडेदहा लाखांमध्ये हक्काचे घर
नोटीस बजावण्याआधी पोलिसांच्या मदतीने फ्लॅटची पाहणी करण्यात आली. या पाहणीवेळी फ्लॅटमध्ये ३५० मांजरी असल्याचे लक्षात आले. मांजरींमुळे निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेचा सोसायटीतील इतर सदस्यांना त्रास होत असल्याचे बघून पुणे महानगरपालिकेच्या पशू संवर्धन विभागाने फ्लॅटच्या मालकिणीला नोटीस बजावली.