मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे अंतर्गत पश्चिम रेल्वे मार्गावर माहीम आणि वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी जम्बो मेगाब्लॉक आहे. तसेच मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त जम्बो मेगाब्लॉक आहे. ब्लॉक काळात अनेक लोकल पूर्ण रद्द केल्या जातील अथवा अंशतः रद्द केल्या जातील. प्रवाशांनी या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेच्या प्रशासनाने केले आहे.
शुक्रवार २४ जानेवारी आणि शनिवार २५ जानेवारी रोजी रात्री १२७ उपनगरीय सेवा रद्द केले जाणार आहे. शनिवार २५ जानेवारी रोजी १५० उपनगरीय लोकल सेवा तर रविवारी २६ जानेवारी रोजी रात्री ६० उपनगरीय सेवा रद्द केल्या जाणार आहे. पश्चिम रेल्वेवर २४ जानेवारी रोजी रात्री ११ ते शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत माहीम आणि वांद्रे स्टेशन दरम्यान सर्व जलद गाड्या या धीम्या गतीच्या मार्गावर परावर्तीत केल्या जाणार आहेत.
एसटीची १४.९५ टक्के भाडेवाढ, २५ जानेवारी मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू
ब्लॉक दरम्यान डाऊन फास्ट मार्गावर रात्री १२.३० ते सकाळी ६.३० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. २५ आणि २६ जानेवारीला रात्री ११ ते रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत अप आणि डाऊन स्लो आणि डाऊन फास्ट मार्गांवर ब्लॉक सुरू होईल. जलद मार्गावर शनिवारी रात्री ११ वाजता ब्लॉक सुरू होऊन रविवारी सकाळी ७.३० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे.
Nitesh Rane : मशिदींवरील भोंगे वाजताना कायद्याची पायमल्ली झाली तर कडक कारवाई करणार
तसेच २४ जानेवारीला शेवटची चर्चगेट-विरार स्लो लोकल रात्री ११.५८ वाजता सुटणार आहे.रात्री ११ वाजेपासून चर्चगेटवरून सुटणाऱ्या सर्व स्लो लोकल मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझ दरम्यान जलद मार्गावरून धावणार आहेत. दरम्यान महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकांवरील लोकलचा थांबा रद्द करण्यात येणार आहे.
शनिवारी सकाळी ६.१४ वाजता चर्चगेटवरून पहिली डाउन फास्ट लोकल सुटणार आहे. २४ जानेवारीला रात्री ११ नंतर विरार, भाईंदर आणि बोरिवलीहून सुटणाऱ्या स्लो गाड्या सांताक्रूझ आणि मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर धावणार आहेत. गोरेगाव आणि वांद्रे येथे पश्चिम रेल्वे लोकल हार्बर मार्गावर धावणार आहे. २५ जानेवारीला सकाळी विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर आणि बोरिवली स्लो आणि फास्ट लोकल अंधेरी स्थानकावर थांबणार आहे. मेगाब्लॉकनंतर चर्चगेटकडे येणारी पहिली फास्ट लोकल शनिवारी सकाळी ५.४७ वाजता विरारहून सुटणार असून सकाळी ७.०५ वाजता पोहोचेल. तर, चर्चगेटवरून पहिली डाऊन फास्ट लोकल सकाळी ६.१४ वाजता सुटेल आणि चर्चगेटवरून पहिली डाउन स्लो लोकल ब्लॉकनंतर सकाळी ८.०३ वाजता सुटणार आहे. दरम्यान काही लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत.
12227 मुंबई सेंट्रल-इंदूर दुरांतो एक्सप्रेस (25th January 2025) 12268 हापा-मुंबई सेंट्रल दुरांतो एक्सप्रेस (26th January 2025) 09052 भुसावळ-दादर स्पेशल (25 जानेवारी 2025) –बोरिवलीपर्यंत 12267 मुंबई सेंट्रल-हापा दुरांतो एक्सप्रेस (25 जानेवारी 2025) 12228 इंदूर-मुंबई सेंट्रल दुरांतो एक्सप्रेस (26 जानेवारी 2025) 19003 दादर-भुसावळ खान्देश एक्सप्रेस (26 जानेवारी 2025) – बोरिवली येथून निघते 19015 दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस (२६ जानेवारी २०२५) – बोरिवली येथून निघते 22946 ओखा-मुंबई सेंट्रल सौराष्ट्र मेल (25 जानेवारी 2025) – बोरिवलीपर्यंतच असणार 12927 दादर-एकता नगर सुपरफास्ट एक्सप्रेस (25 जानेवारी 2025) – बोरिवली येथून निघते 12902 अहमदाबाद-दादर गुजरात मेल (25 जानेवारी 2025) – पालघरपर्यंतच असणार 59024 वलसाड-मुंबई सेंट्रल पॅसेंजर (26 जानेवारी 2025) – बोरिवलीपर्यंतच असणार 59045 मुंबई सेंट्रल-वापी पॅसेंजर (26 जानेवारी 2025) – बोरिवली येथून निघणार 19016 पोरबंदर-दादर सौराष्ट्र एक्सप्रेस (२४ जानेवारी २०२५) – बोरिवलीपर्यंतच असणार 12904अमृतसर-मुंबई सेंट्रल गोल्डन टेंपल मेल (24 जानेवारी 2025) – अंधेरीपर्यंतच असणार
मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त सीएसएमटी – मस्जिद दरम्यान २५, २६, २७ जानेवारी आणि १, २, ३ फेब्रुवारी रोजी मोठा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅक कालावधीत मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन धीम्या, जलद मार्गावरील लोकल सीएसएमटी – भायखळा दरम्यान उपलब्ध नसतील. तर, हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन लोकल वडाळा रोड – सीएसएमटी दरम्यान उपलब्ध नसतील.
ब्लॉक कालावधीत मुख्य मार्गावरील भायखळा – सीएसएमटी स्थानकांदरम्यान आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड – सीएसएमटी स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध राहणार नाहीत. मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन लोकल सेवा ठाणे, कुर्ला, परळ आणि भायखळा या स्थानकांवरून सुटतील. तर, हार्बर मार्गावरील लोकल वडाळा येथून पनवेलच्या दिशेने धावतील. डाऊन धीम्या मार्गावरील टिटवाळा-सीएसएमटी लोकल रात्री १०.५० वाजता सुटेल आणि टिटवाळा येथे रात्री १२.३३ वाजता पोहोचेल. डाऊन जलद मार्गावरील कसारा- सीएसएमटी लोकल १०.४७ वाजता सुटेल आणि कसारा येथे रात्री १.१२ वाजता पोहचेल. अप धीम्या मार्गावरील कल्याण-सीएसएमटी लोकल रात्री ९.१६ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे रात्री १०.४५ वाजता पोहचेल. अप जलद मार्गावरील कल्याण-सीएसएमटी लोकल रात्री १०.०२ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथ रात्री ११.०४ वाजता पोहचेल. डाऊन धीम्या मार्गावरील अंबरनाथ- सीएसएमटी येथून पहाटे ५.४० वाजता सुटेल आणि अंबरनाथ येथे सकाळी ७.२३ वाजता पोहोचेल. डाऊन जलद मार्गावरील कर्जत- सीएसएमटी येथून पहाटे ५.४६ वाजता सुटेल आणि कर्जत येथे सकाळी ७.४३ वाजता पोहोचेल. अप धीम्या मार्गावर ठाणे येथून पहाटे ४.४८ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे पहाटे ५.४६ वाजता पोहोचेल. अप जलद मार्गावरील ठाणे येथून पहाटे ५.०८ वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे पहाटे ५.५२ वाजता पोहोचेल.
सीएसएमटी येथून रात्री १०.५८ वाजता लोकल सुटेल आणि पनवेल येथे रात्री १२.१८ वाजता पोहोचेल. सीएसएमटी येथून रात्री १०.५४ वाजता लोकल सुटेल आणि गोरेगाव येथे रात्री ११.४९ वाजता पोहोचेल. पनवेल येथून रात्री ९.३९ वाजता लोकल सुटेल आणि सीएसएमटी येथे रात्री १०.५८ वाजता पोहचेल. वांद्रे टर्मिनस येथून रात्री १०.२४ वाजता लोकल सुटेल आणि सीएसएमटी येथे रात्री १०.५४ वाजता पोहोचेल. सीएसएमटी येथून सकाळी ६ वाजता लोकल सुटेल आणि सकाळी ७.२० वाजता पनवेल येथे पोहोचेल. सीएसएमटी येथून पहाटे ५.५० वाजता लोकल सुटेल आणि सकाळी ६.४४ वाजता गोरेगाव येथे लोकल पोहोचेल. बेलापूर येथून पहाटे ४.५३ वाजता लोकल सुटेल आणि सीएसएमटी येथे पहाटे ५.५६ वाजता पोहोचेल. गोरेगाव येथून पहाटे ५.०५ वाजता लोकल सुटेल आणि सीएसएमटी येथे सकाळी ६ वाजता पोहोचेल.