मुंबई : मालाड पश्चिम येथील १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून पाण्याची गळती होत आहे. जलवाहिनीची दुरुस्ती करुन गळती बंद करण्यासाठी तातडीने काम केले जाणार आहे. या कामामुळे मालाड पश्चिम, गोरेगाव पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवार २५ जानेवारी २०२५ रोजी बंद राहणार आहे. जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शुक्रवार २४ जानेवारी २०२५ रोजी रात्री १०.३० पासून शनिवार २५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या पाणी विभागाने केले आहे.
एसटीची १४.९५ टक्के भाडेवाढ, २५ जानेवारी मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू
‘या’ भागात शनिवार २५ जानेवारी २०२५ रोजी पाणी बंद
मालाड पश्चिम – अंबुजवाडी, आझमी नगर, जनकल्याण नगर
गोरेगाव पश्चिम – उन्नत नगर, बांगुर नगर, शास्त्री नगर, मोतीलाल नगर, सिद्धार्थ नगर, जवाहर नगर, भगतसिंग नगर, राम मंदिर मार्ग