Monday, February 10, 2025
Homeब्रेकिंग न्यूजएसटीची १४.९५ टक्के भाडेवाढ, २५ जानेवारी मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू

एसटीची १४.९५ टक्के भाडेवाढ, २५ जानेवारी मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू

मुंबई : सर्वसामान्य प्रवाशांना दूरपर्यंतच्या ठिकाणांवर सुरक्षित पोहचवणाऱ्या लाल परीची अर्थात एसटी बसची शुक्रवारपासून ३ रुपयांनी दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गोरगरीब प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने सादर केलेल्या एसटी दरवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

हकिम समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही भाडेवाढ दिनांक २५ जानेवारी (२४ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्रीनंतर) पासून अंमलात येईल, असे निर्देश राज्य परिवहन प्राधिकरणाने दिले आहे.

वाहनासाठी आवश्यक असलेल्या डिझेल, चेसीस, टायर या घटकांच्या किंमतीत बदल झाल्यामुळे तसेच महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे भाडेवाढ सुत्रानुसार महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बसेसच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाच्या २७६ व्या बैठकीत विचारार्थ सादर करण्यात आला. मागील भाडेवाढ दिनांक २६ ऑक्टोंबर २०२१ रोजी करण्यात आली होती.

मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या तरतूदीनुसार शासनाने राज्य परिवहन प्राधिकरणाची स्थापना केली आहे. राज्य परिवहन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांची २७६ वी बैठक अपर मुख्य सचिव, गृह विभाग (परिवहन) तथा अध्यक्ष, राज्य परिवहन प्राधिकरण संजय सेठी यांच्या अध्यक्षतेखाली २३ जानेवारी रोजी झाली. सदर बैठकिस राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) व परिवहन आयुक्त उपस्थित होते.

Nitesh Rane : मशिदींवरील भोंगे वाजताना कायद्याची पायमल्ली झाली तर कडक कारवाई करणार

या बैठकीत महामंडळाच्या पर्यावरणपूरक नविन बीएस ६ मानकाच्या नविन साध्या बसेस टोमॅटो लाल रंगसंगतीस मान्यता देण्यात आली. महामंडळाने ५० ई-बसेससाठी पांढरा व हिरवा रंग तसेच १०० ई-बसेससाठी सद्यस्थितीत चलनात असलेल्या शिवनेरी प्रमाणेच आकाशी रंगसंगतीस मान्यता देण्यात आली. तसेच रेन्ट-ए-कॅब लायसन्स धारकांचे रेन्ट-ए-कॅब लायसन्स नूतनीकरण करण्यास व अर्जदारास नवीन रेन्ट-ए-कॅब लायसन्स जारी करण्यास मान्यता देण्यात आली, असे राज्य परिवहन प्राधिकरणाचे सचिव भरत कळसकर यांनी कळविले आहे.

अशी आहे भाडेवाढ

सेवेचा प्रकार : साधी बस – सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये,

जलद सेवा (साधारण) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये.

रात्र सेवा (साधारण बस) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये.

निम आराम : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १३.६५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये.

विनावातानुकूलीत शयन आसनी: सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १३.६५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये.

विनावातानुकूलीत शयनयान : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १४.७५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १६ रुपये.

शिवशाही (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. १२.३५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १४.२० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १६ रुपये.

जनशिवनेरी (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. १२.९५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १४.९० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.

शिवशाही स्लिपर (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. १३.३५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १५.३५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.

शिवनेरी (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. १८.५० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर २१.२५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) २३ रुपये.

शिवनेरी स्लिपर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. २२ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर २५.३५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) २८ रुपये,

ई बस ०९ मिटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. १२ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १३.८० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये,

ई-शिवाई / ई बस १२ मिटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. १३.२० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १५.१५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -