मुंबई : व्यावसायिक विश्वातील नामांकित नाव असलेले मंगलप्रभात लोढा यांच्या दोन्ही मुलांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. भाजप नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या दोन्ही मुलांमध्ये पडलेली व्यावसायिक फूट वाढली आहे. व्यापार चिन्हाच्या स्वामित्व हक्कावरुन दोघा भावांमध्ये संघर्ष सुरु आहे.
Valentine Day Special : हवामानामुळे फुलांचा राजा ‘व्हॅलेंटाईन डे’ ला हिरमुसणार!
मंगलप्रभात लोढा हे बांधकाम व्यवसायातील गाजलेलं नाव आहे. मंगलप्रभात लोढा यांचे अनेक बांधकामांचे प्रकल्प प्रसिद्ध आहेत. शिवाय त्यांचे दोन्ही मुलं व्यवसाय करत आहेत. दोघांचीही स्वतंत्र कंपनी असून मोठे पुत्र अभिषेक याची मॅक्रोटेक डेव्हलपर्स नावाची कंपनी आहे तर अभिनंदन लोढा याची ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ नावाची कंपनी आहे. मात्र आता लोढांचे मोठे चिरंजीव अभिषेकने धाकट्या भावाच्या ‘हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’ या कंपनीविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. लोढा समुहाचा लोगो वापरण्यापासून रोखण्यासाठी अभिषेकने याचिका दाखल केली आहे. तसेच लोढा ग्रुपचा लोगो वापरण्यास अभिनंदन लोढा यांना मनाई करावी, अशी मागणी याचिकेतून कोर्टाकडे करण्यात आली आहे. इतकंच नव्हे, तर ५ हजार कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान आता हा वाद वाढणार की शांततेत सुटणार याकडे पहाणे महत्त्वाचे ठरेल