Wednesday, May 13, 2026

पंढरपूर येथील पाच एकर जागेत भक्तनिवास होणार : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

पंढरपूर येथील पाच एकर जागेत भक्तनिवास होणार : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई:  पंढरपूर येथील पाच एकर जागेत माजी सैनिक कल्याण विभाग, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे देवस्थान व पर्यटन विभागाच्या समन्वयातून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची जागा भक्तनिवासासाठी विकसित करा पर्यटन विभागाने कार्यवाही करावी अशा सूचना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.मेघदूत शासकीय निवासस्थान येथे पंढरपूर येथील पर्यटन विभागाच्या जागेचा विकास करण्यासंदर्भात आयोजित बैठकीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते.

यावेळी पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक ,पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पंढरपूर समितीचे सह अध्यक्ष गहिणीनाथ महाराज (औसेंकरे ), कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पंढरपूर येथील पाच एकर जागेत माजी सैनिक, देवस्थान व पर्यटन विभागाच्या समन्वयातून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची जागा विकसित करा. सर्वांच्या सूचना लक्षात घेवून सर्वसमावेशक असे काम करण्यात यावे. या कामासाठी प्रकल्प सल्लागार नेमणार आणि सर्वोत्कृष्ट प्रकल्प करण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >