पुणे : फेब्रुवारी महिना प्रेमवीरांसाठी खास मानला जातो. याच फेब्रुवारी महिन्यात ‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेमवीरांच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे . या ‘व्हॅलेंटाईन डे’ ला गिफ्ट सोबत प्रियकर प्रेयसीला गुलाब देतात. या गुलाबाच्या पाकळ्या प्रेमाचं प्रतीक मानलं जात. या दिवसात गुलाबांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. मात्र या वर्षी फुलांचा राजा प्रेमवीरांना नाराज करणार असल्याचे चित्र दिसते आहे. हवामानाच्या बदलत्या स्वरूपामुळे गुलाबाच्या फुलांच्या पिकावर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात येणारी गुलाबाची फुल मुबलक प्रमाणावर दिसतील अशी माहिती समोर आली आहे.
Vinod Kambli Film : सचिननंतर विनोद कांबळीचे आयुष्य आता प्रेक्षकांसमोर उलगडणार!
फेब्रुवारी महिन्यात गुलाबाची फुलं जास्त प्रमाणात दिसतात. या दिवसात गुलाबाच्या फुलांना शेतकऱ्यांना समाधानकारक वाटणारा बहर येतो. मावळमध्ये हवामानाच्या लपंडावामुळे गुलाबावर परिणाम होत आहे. त्यामुळे गुलाब शेतीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी फुल उत्पादक योग्य ती काळजी घेतं आहेत. त्यासाठी औषध फवारणी सह इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आता खर्च वाढला आहे. तर दुसरीकडे थंडी अभावी फुलांचे उत्पादन लवकर येण्याची शक्यता असल्याने व्हॅलेंटाईन डे साठीच्या उत्पादनाचे नियोजन विस्कळीत होण्याची शक्यता फुल उत्पादकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येणार ‘व्हॅलेंटाईन डे’ शेतकऱ्यांसाठी कोणतं आव्हान घेऊन येतो हे बघणं महत्त्वाचं ठरेल.