Wednesday, May 13, 2026

मुंबई शहरातील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाच्या बाबत शासन सकारात्मक : प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई

मुंबई शहरातील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाच्या बाबत शासन सकारात्मक : प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई

मुंबई: मुंबई शहरातील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाच्या बाबत शासन सकारात्मक असून या कामाला गती देण्यासाठी नगरविकास विभागाने गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.मेघूदत या शासकीय निवासस्थानी येथे विधिमंडळ अधिवेशनादरम्यान लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्न व लक्षवेधींतील मुंबई शहरातील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासात येणाऱ्या अडचणी संदर्भात आयोजित बैठकीत प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई बोलत होते.

यावेळी या बैठकीत आमदार मनोज जामसुतकर, आमदार रईस शेख, आमदार मनीषा चौधरी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर व म्हाडा इमारत पुनर्विकासातील रहिवासी यावेळी उपस्थित होते.उपस्थित आमदारांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. आमदारांनी मांडलेल्या प्रश्नांवर तातडीने बैठक घेऊन निर्णय प्रक्रियेला गती देणारे आपण एकमेव मंत्री असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांबाबत दाखविलेली तत्परता आणि समन्वयात्मक भूमिका प्रशंसनीय असल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा