चेन्नई : भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना आज, मंगळवारी पहाटे चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. दास यांना छातीत दुखत असल्यामुळे रुग्णालयात भर्ती करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आरबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
Mumbai 26/11 Attack: राज्यपालांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह पोलीस हुतात्म्यांना अभिवादन
शक्तिकांत दास यांना ॲसिडिटीचा त्रास झाल्याने चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती ठीक आहे आणि पुढील काही तासांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. काळजी करण्याचे कारण नसल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले.