नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात आणखी एक ऐतिहासिक मैलाचा दगड गाठला आहे. सलग सर्वाधिक काळ देशाचे निवडून आलेले पंतप्रधान म्हणून त्यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विक्रम मागे टाकला आहे. २०१४ मध्ये प्रथमच पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतलेल्या मोदींनी आता सलग १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत भारतीय राजकारणाच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. (PM Modi - Meloni)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सलग पदावर राहिलेले निवडून आलेले पंतप्रधान ठरले आहेत. बुधवारी ...
मेलोनींचा खास संदेश चर्चेत :
जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे, "नरेंद्र मोदी, हार्दिक शुभेच्छा! आज तुम्ही भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सेवा करणारे पंतप्रधान बनला आहात. नुकतीच रोममध्ये आपली पुन्हा भेट झाली. भारतासोबतची विशेष रणनीतिक भागीदारी अधिक मजबूत करताना आनंद होत आहे. यामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी नव्या संधी निर्माण होतील." (PM Modi - Meloni)
मेलोनी यांच्या या संदेशाची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली असून भारत-इटली संबंधांमधील वाढत्या सहकार्याचाही त्यातून उल्लेख करण्यात आला आहे.
नेहरूंचा विक्रम मोडला :
तीन निवडणुका, तीन विजय :
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने २०१४, २०१९ आणि २०२४ या सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवला. त्यामुळे ते सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले. त्यांच्या नेतृत्वात भारताने आर्थिक, पायाभूत, डिजिटल आणि परराष्ट्र धोरणाच्या क्षेत्रात अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले आहेत. (PM Modi - Meloni)
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi New Record) यांनी भारतीय राजकारणात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सलग सर्वाधिक काळ देशाचे निवडून आलेले ...
जागतिक स्तरावर वाढलेला प्रभाव :
गेल्या दशकात भारताने जागतिक राजकारणात आपली ताकद अधिक ठळकपणे दाखवली आहे. G20 अध्यक्षपद, ग्लोबल साऊथचा प्रभावी आवाज, वाढती अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय कूटनीतीमधील सक्रिय भूमिका यामुळे मोदींच्या नेतृत्वाची जगभरात दखल घेतली जात आहे. या ऐतिहासिक टप्प्यानंतर आता मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत कोणते नवे विक्रम प्रस्थापित करणार, याकडे देशासह जगाचे लक्ष लागले आहे. (PM Modi - Meloni)
View this post on Instagram





