पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणात आणखी एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. 10 जून रोजी सलग 4,399 दिवस पंतप्रधानपदावर (Prime Minister) राहून त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा 4,398 दिवसांचा विक्रम मागे टाकला आहे. यामुळे नरेंद्र मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सलग कार्यरत राहिलेले लोकनियुक्त पंतप्रधान ठरले आहेत. (PM Narendra Modi)
विशेष म्हणजे हा ऐतिहासिक टप्पा राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या सत्तेतील 12 वर्षांच्या पूर्णतेसोबत गाठला गेला आहे. 2014 मध्ये प्रथमच पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतलेल्या नरेंद्र मोदी यांनी 2019 आणि 2024 मध्येही विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन केले. (Narendra Modi Longest Serving PM)
बीड : देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तम मंदिरासाठी प्रसिद्ध असलेल्या बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे अधिकमास यात्रेदरम्यान एक मोठी दुर्घटना घडली ...
या ऐतिहासिक कामगिरीच्या निमित्ताने नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित महत्त्वपूर्ण परिषदेत पंतप्रधान मोदी अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या बैठकीला एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आघाडीतील वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.
गेल्या 12 वर्षांत केंद्र सरकारने आर्थिक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधा आणि सामाजिक कल्याणाच्या क्षेत्रात अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या. त्यामध्ये प्रधानमंत्री जनधन योजना, मेक इन इंडिया, प्रधानमंत्री मुद्रा योजना, उत्पादन संलग्न प्रोत्साहन (PLI) योजना, इंडिया AI मिशन आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजना यांचा प्रमुख समावेश आहे.
2014 मध्ये सुरू झालेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेमुळे कोट्यवधी नागरिक बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले. मेक इन इंडिया उपक्रमाद्वारे उत्पादन क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुद्रा योजनेच्या माध्यमातून लघु उद्योजकांना तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. तर पीएलआय योजनेमुळे भारतातील उत्पादन उद्योगाला मोठी गती मिळाली.
Nashik News : शेतकऱ्यांवर येणारं संकट , त्याची होणारी पिळवणूक नेमकी थांबणार कधी हा मोठा प्रश्न पुन्हा एका घटनेनं उपस्थित झाला आहे. नाशिक जिल्ह्यात ...
अलीकडील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भारताला जागतिक स्तरावर सक्षम बनवण्यासाठी इंडिया AI मिशन सुरू करण्यात आले आहे. तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना एलपीजी गॅस कनेक्शन उपलब्ध करून देण्यात आले.
मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या प्रवासात अनेक महत्त्वाचे निर्णय, विविध कल्याणकारी योजना आणि पायाभूत विकास प्रकल्प राबवण्यात आले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवण्याचा विक्रम प्रस्थापित केल्याने भारतीय राजकारणात हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.






