मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनिता पाटील (Anita Patil) यांच्या सख्ख्या भावाला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी POCSO कायद्याअंतर्गत अटक (Arrest) करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपीला संरक्षण देण्याचा आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत अनिता पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. (Crime News)
या मागणीसाठी बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्ट आणि पेणकर पाडा ग्रामस्थांच्या वतीने महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सभापतींच्या राजीनाम्याची मागणी केली.
नागपूर: उपराजधानी नागपुरातील (Nagpur) सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छोटा ताजबाग परिसरात बुधवारी रात्री दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली. फळ ...
आंदोलकांच्या माहितीनुसार, अनिता पाटील यांचे भाऊ राजेश चव्हाण यांच्यावर एका अल्पवयीन मुलीवर अनेक वर्षे लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांना POCSO कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. आरोपीने पीडित मुलीला कारमध्ये डांबून तसेच गोराई परिसरातील एका हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पीडित मुलगी आणि तिच्या आईला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचाही आरोप आहे.
आरोपी राजेश चव्हाण यांच्याविरोधात यापूर्वीही वीज चोरी आणि पत्रकारावर हल्ला केल्याचे गुन्हे दाखल असल्याचे आंदोलकांनी सांगितले. दरम्यान, या गंभीर प्रकरणात सभापती अनिता पाटील यांनी आपल्या पदाचा प्रभाव वापरून आरोपीला मदत करण्याचा प्रयत्न केला, तसेच पीडित कुटुंबीय आणि तपास यंत्रणांवर दबाव आणण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ (Simhastha Kumbh Mela 2027) दरम्यान अमृत पर्वणीच्या दिवशी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये खासगी वाहनांना ‘नो एंट्री’ लागू करण्यात येणार ...
यामुळे महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदावर राहण्याचा नैतिक अधिकार अनिता पाटील यांनी गमावला असून त्यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. याबाबतचे निवेदनही महापालिका प्रशासनाला सादर करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपांबाबत अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.






