Thursday, June 11, 2026

Satara Jawan Shahid : उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण; साताऱ्याच्या जवानाच्या निधनाने हळहळ

Satara Jawan Shahid : उरी सेक्टरमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण; साताऱ्याच्या जवानाच्या निधनाने हळहळ

सातारा : जम्मू-काश्मीरमधील (Jammu & Kashmir) उरी सेक्टरमध्ये (Uri Sector) कर्तव्य बजावत असताना सातारा (Satara) जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापूर गावचे जवान अर्जुन राजेंद्र जाधव (वय ३०) यांना वीरमरण आले आहे. Hand Grenade च्या स्फोटात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तातडीने लष्कराच्या (Army) रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे शहापूर गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन जाधव हे भारतीय लष्कराच्या (Indian Army) बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपचे (Bombay Engineering Group) जवान होते. सध्या ते काश्मीरमधील ८ RR (Rashtriya Rifles) युनिटमध्ये कार्यरत होते. उरी सेक्टरमध्ये सुरू असलेल्या एका ऑपरेशनदरम्यान (Operation) Hand Grenade चा स्फोट झाला आणि त्यात ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना लष्करी रुग्णालयात (Military Hospital) दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

अर्जुन जाधव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या मुलाचा पहिला वाढदिवस (First Birthday) येत्या २५ जून रोजी साजरा होणार होता. लेकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अर्जुन जाधव १५ जून रोजी सुट्टीवर (Leave) घरी येणार होते. मात्र त्याआधीच त्यांना वीरमरण आल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शहीद अर्जुन जाधव यांचे पार्थिव शुक्रवारी त्यांच्या मूळ गावी शहापूर येथे आणले जाणार असून शासकीय इतमामात (State Honours) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात असून देशसेवेसाठी दिलेल्या त्यांच्या बलिदानाला श्रद्धांजली वाहिली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >