गांधीनगर : दारूबंदी (Liquor ban) असणाऱ्या गुजरातमध्ये तयार होणाऱ्या गिफ्ट सिटीमध्ये दारू विक्रीस परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
याबाबत बोलताना मंत्री ऋषिकेश पटेल यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गिफ्ट सिटीचा पाया रचला आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक येणार आहे. त्यासोबतच विदेशातील कित्येक पाहुणे देखिल याठिकाणी येतील. दारु पिणे हा त्यांच्या लाईफस्टाईलचा भाग आहे. त्यामुळेच त्यांची चांगली सोय व्हावी याठिकाणी दारूला परवानगी देण्यात आली आहे.