नवी दिल्ली: केंद्र सरकार छोट्या बचत योजनेंतर्गत अनेक स्कीम्स चालवत आहेत. प्रत्येक वर्गाला फायदा देण्यासाठी या योजनांची सुरूवात करण्यात आली. अर्थमंत्रालयाच्या इकॉनॉमिक अफेयर्स डिपार्टमेंटकडून या छोट्या बचत खात्यांमधील गुंतवणुकीचे नियम आणि व्याज ठरवले जाते.
सध्याच्या काळात या योजनेंतर्गत नऊ योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यात रिकरिंग डिपॉझिट, पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान सेव्हिंग स्कीम, किसान विकास पत्र, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आणि सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीम सामील आहेत.
नुकतेच सरकारने या छोट्या बचत योजनेंच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. जर तुम्हीही या योजनेत गुंतवणूक केली तर बदललेल्या नियमांबद्दल जाणून घेतले पाहिजे.
सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीममध्ये काय झाला बदल
जर एखाद्या व्यक्तीने सीनियर सिटीजन्स सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक केले तर त्यासाठी बदललेला नियम खास आहे. सरकारने दिलासात खाते खोलण्याचा कालावधी वाढवला आहे. ९ नोव्हेंबरला जारी केलेल्या सर्कुलरनुसार रिटायरमेंट होण्याच्या तीन महिन्याच्या आत तुम्ही या योजनेंतर्गत अकाऊंट खोलू शकता. रिटायरमेंटला लाभ देण्याच्या या योजनेचा लाभ उचलू शकता.
पीपीएफचे बदललेले नियम
पीपीएफ स्कीम अंतर्गत जर वेळेआधी अकाऊंट बंद करायचे आहे तर त्याचे नियम बदललेले आहेत. नोटिफिकेशननुसार पब्लिक प्रोव्हिडंट फंड २०२३ अंतर्गत मोडिफिकेशन करण्यात आले आहे. नॅशनल सेव्हिंग टाईम डिपॉझिट स्कीम अंतर्गत पैसे काढण्याबाबत रूपरेषा तयार करण्यात आली आहे.
पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाऊंट
जर एखाद्या व्यक्तीने पाच वर्षांसाठीच्या योजनेत गुंतवणूक केली आणि ते वेळेआधी म्हणजेच ४ वर्षाआधी अकाऊंट विड्रॉवल करत असेल तर व्याजाचे पैसे पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले जातील. नियमानुसार जर पाच वर्षांच्या टाईम डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवले आणि चार वर्षात खाते बंद केले तर व्याज तीन वर्षाच्या टाईम डिपॉझिट अकाऊंटच्या आधारावर कॅलक्युलेट केले जाईल.