Saturday, April 27, 2024
Homeक्रीडालोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही-रोहित शर्मा

लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही-रोहित शर्मा

ट्रोल करणाऱ्यांना रोहितची चपराक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): एक क्रिकेटपटू म्हणून लोक काय बोलतात याकडे लक्ष देत नाही, अशा शब्दांत भारताचा नवा वनडे कर्णधार रोहित शर्माने ट्रोल करणाऱ्यांना चपराक लगावली आहे.


तुम्ही देशासाठी खेळता तेव्हा तुमच्यावर नेहमीच दबाव असतो. लोक सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बोलतात. पण आमचे लक्ष खेळावर कायम आहे. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, कारण तुम्ही त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे संघाला समजून घेणे. मोठ्या स्पर्धांमध्ये लोक जास्त बोलतात, असे रोहितने बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
रोहित शर्माने पुढे म्हटले की, विजय मिळवण्यासाठी शक्य ते प्रत्येक जण करतो. प्रत्येक वेळी जिंकण्याचाच प्रयत्न असतो. आपण एकमेकांबद्दल काय विचार करतो, हे महत्त्वाचे आहे. खेळाडूंमध्ये घट्ट बंधन असायला हवे, तरच आपण लक्ष्य गाठू शकू. राहुल भाई आम्हाला नेहमीच मदत करतात.


रोहितला टी-ट्वेन्टी पाठोपाठ वनडे संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताला तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. त्यापूर्वी, २६ डिसेंबरपासून कसोटी मालिका सुरू होत आहे. युएईत झालेल्या टी-ट्वेन्टी विश्वचषकानंतर विराट कोहलीने टी-ट्वेन्टी संघाचे कर्णधारपद सोडले. तेव्हापासून रोहितकडे वनडे संघाचे कर्णधारपद सोपवले जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, कोहली वनडे संघाचे कर्णधारपद सोडण्यास तयार नव्हता. रोहितच्या कर्णधारपदाखाली भारताने चांगली सुरुवात केली आहे. घरच्या मैदानावर टी-ट्वेन्टी मालिकेत न्यूझीलंडचा ३-० अशा फरकाने पराभव केला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -