Friday, April 26, 2024
Homeताज्या घडामोडीदिल्लीत यलो अलर्ट जारी

दिल्लीत यलो अलर्ट जारी

नवे निर्बंध लागू

नवी दिल्ली : नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर असतानाच देशभरात कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. दिल्लीतली वाढती करोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन दिल्ली सरकारने यलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही निर्बंध लागू केले आहे. यामध्ये दिल्लीतली चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स पुन्हा एकदा बंद करण्यात आले आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. त्या बैठकीत श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजना(जीआरएपी)अंतर्गत राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, तसेच पुन्हा काही निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही दिवसांत दिल्लीतला कोविड-१९ पॉझिटिव्हीटी रेट ०.५ टक्क्याच्या वर आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद ठेवण्याबरोबरच हॉटेल्स, रेस्तराँ यासारख्या सार्वजनिक ठिकाणी आसनक्षमता ५० टक्के करण्यात आली आहे. रात्री १० ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून शाळा, महिवाद्यालयेही बंद ठेवण्यात येणार आहेत.

दुकाने आणि वस्तू सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सम-विषम तत्त्वावर उघडतील तर, आठवडी बाजार एका झोनमध्ये फक्त एकच उघडेल, ज्यामध्ये फक्त ५० टक्के दुकानदारांना परवानगी असेल. मेट्रो आणि बसेस ५० टक्के क्षमतेने धावतील. याशिवाय, रेस्टॉरंट्स ५० टक्के क्षमतेसह सकाळी ८ ते रात्री १०पर्यंत उघडतील. ५० टक्के क्षमतेसह बार दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत उघडतील. तर, लग्न समारंभात फक्त २० लोकांनाच परवानगी असेल. धार्मिक स्थळे खुली राहतील, मात्र भाविकांना जाण्यास मनाई आहे. सांस्कृतिक उपक्रम आणि क्रीडा उपक्रमांवर बंदी लागू करण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -